उरण येथे नेत्र चिकित्सा शिबिर सम्पन्न

उरण रायगड
हेमंत सुरेश देशमुख
उरण ब्राह्मण सभा आणि स्टेटस आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने उरण येथे नेत्र चिकित्सा शिबिर आज सम्पन्न झाले
आज दिनांक 12/11/2022 रोजी उरण ब्राह्मण सभा आणि स्टेटस आय क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले उरण ब्राह्मण सभा तर्फे गेल्या कित्येक वर्षांपासून असे सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येत आहे आज लक्ष्मी नारायण मंदिर येथे ब्राह्मण सभा हॉल येथे हे शिबिर घेण्यात आले या शिबिरास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला
शिबिर यशस्वी करण्यासाठी ब्राह्मण सभा तर्फे उपाध्यक्ष श्री हनुमंत वासुदेव आर्य, सेक्रेटरी श्री वैभव चंद्रकांत रेईलकर, खजिनदार श्री हेमंत धामणकर, विश्वस्त विराम उपाध्ये, सदस्य प्रभाकर दाते, तसेच ब्राह्मण सभा तर्फे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले