पद्मशाली समाजातील युवकांसाठी पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा..

.
श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन
आणि
श्री मार्कंडेय जनजागृती संघटनेचा उपक्रम
सोलापूर प्रतिनिधी
महाराष्ट्रात पोलीस भरतीचे जाहिरात संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्हास्तरावर स्थानिक वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. यंदा मात्र तब्बल पंधरा हजार नवीन पोलीस भरती करण्यात येणार आहे. यामुळे शासकीय नोकरी आणि शिस्तबद्ध, कर्तव्यदक्ष पदावर राहून स्वतःला झोकून सिध्द करण्याची संधी मिळत आहे, यामुळे
मान – सन्मान, समाजात प्रतिष्ठा मिळतेच याचे सातत्याने भान ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. राज्यभरातील पद्मशाली समाजातील युवती आणि युवकांसाठी पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा रविवार, दि. २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ठीक (शार्प) ४.०० वाजता पूर्व भागातील लक्ष्मीनारायण टॉकीज जवळील बुर्ला मंगल कार्यालय येथे आयोजन केल्याची माहिती फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा आणि जनजागृती संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर राचर्ला यांनी संयुक्तपणे दिले आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षांपासून पोलीस भरती प्रक्रिया करण्यात आले नाही. यामुळे दिवसेंदिवस बेरोजगारी मध्ये वाढ होऊन युवकांचे मानसिक संतुलन बिघडत चालली आहे. हे ओळखून पद्मशाली समाजातील युवती आणि युवकांना आधार देण्यासाठी सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि श्री मार्कंडेय जनजागृती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन केले आहे. पोलीस भरतीसाठी अर्ज कसा करावा, आवश्यक कागदपत्रे काय..? याबाबत अधिक माहिती व मार्गदर्शन या कार्यशाळेत सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक बाबू गंधमल साहेब आणि त्यांचे सहकारी देणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी सांगितले आहे.
पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळेत पद्मशाली समाजातील युवती आणि युवकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावेत आणि अधिक माहितीसाठी 9552218641 या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी, श्रीनिवास कामूर्ती, लक्ष्मण दोंतूल, अंबादास गुर्रम, मधुसूदन माचरला, अंबादास आधेली, बालाजी कुंटला, नवनीत पोला तसेच जनजागृती संघटनेचे विश्वस्त मार्कंडेय आडम, रमेश खाली, देविदास चिन्नी, श्रीनिवास रच्चा, श्रीनिवास भैरी, उपाध्यक्ष गोविंद जलदुर्गम, बालराज बिंगी, बालराज यनगंटी, तिरुपती वग्गा, पुंडलिक गाजंगी, सचिव जनार्दन पिस्ते, कार्याध्यक्ष किशोर व्यंकटगिरी, सहसचिव वेणू कोडम, संतोष सोमा, खजिनदार देविदास इट्टम, सहखजिनदार रवी बोल्ली, प्रसिध्दी प्रमुख अमर जक्कन, विभाग प्रमुख विठ्ठल शेरला, अंबादास वग्गू, रमेश राचर्ला, रविंद्र भारत, किसन दावत, नवीन राहूल, सल्लागार नितीन मार्गम,विजय इप्पाकायल यांनी केले आहे.
my district is jalna so how can i join the workshop