अमृता फडणवीस यांनी केले पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती ला अभिवादन!

लोणी-जनसेवा फाऊंडेशन आणि पंचायत समिती राहाता यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या महीला बचत गटांचा मेळावा गायिका आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.अमृता फडणवीस यांच्या उपस्थीतीत संपन्न झाला.मेळाव्यात त्यांनी महीलांशी संवाद साधला.

प्रारंभी फौडेशनच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या सिंधूताई शेतकरी उत्पादक कंपनीचा शुभारंभ,महीलां करीता व्यायामशाळेचे उद्घाटन सौ.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच बचत गटांना दोन कोटी रुपयांच्या अनुदानाचे आणि प्रधानमंत्री अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत बीयाणाचे वाटप करण्यात आले.

प्रारंभी सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृती स्थळावर सौ.फडणवीस यांनी अभिवादन केले.

जनसेवा फौंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या सेंद्रीय सॅनेटरी पॅडच्या उत्पादनाची पाहाणी केली.

याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ सुजयदादा विखे पाटील,भाजपाच्या महीला जिल्हा अध्यक्षा सौ.सोनाली नाईकवाडी ,विखे पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास राव कडू, सर्व संचालक,लोणी बु चे सरपंच कल्पना मैड, उपसरपंच गणेश विखे यांच्या सह सर्व ग्रामपंचायत सदस्य उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे,तालुका कृषी अधिकारी बापुसाहेब शिंदे ,गटविकास अधिकारी सोनवणे ,डॉ हरीभाऊ आहेर ,सौ.लिलावती सरोदे यांच्यासह पदाधिकारी महीला उपस्थित होते.
