इतर

गुंजाळवाडी शिवारात हुक्का पार्लरवर छापा ! संगमनेर करांना जडतेय हुक्क्या ची नशा!

संजय साबळे

संगमनेर प्रतिनिधी

संगमनेर शहरालगत असणाऱ्या गुंजाळवाडी शिवारात सुरू असणाऱ्या हुक्का पार्लरवर नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने छापा टाकला यात ५५ ,७५० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून ९ जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

नगरच्या गुन्हा अन्वेषण विभागाला संगमनेर शहरानजीक असणाऱ्या गुंजाळवाडी शिवारातील हॉटेल ग्रीन लीप शेजारी असणाऱ्या पत्र्याच्या शेडच्या आडोशाला विनापरवाना हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यावर या पथकाने मंगळवारी रात्री ९:३०वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी २७ हजार रुपये किंमतीचे हुक्का पिण्यासाठी लागणारे काचेचे व स्टीलचे नऊ पॉट २६०० रुपयाचे हुक्का पिण्यासाठी लागणारे तेरा रबरी पाईप याबरोबर विविध कंपन्यांचे अर्धवट वापरलेले केमिकलचे डबे व इतर साहित्य असा एकूण ५५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला

विनापरवाना हुक्का पार्लर चालवणाऱ्या संतोष अशोक वांढेकर (वय ३४) रा. लक्ष्मीनगर गुंजाळवाडी, याच्यासह हुक्का चा आनंद घेणारे संकेत नारायण कलंत्री (वय ३६) रा. बाजारपेठ संगमनेर, गणेश शिवप्रसाद लाहोटी (वय ३५) रा. शिवाजीनगर संगमनेर, श्रेयस श्रीकांत मणियार (वय ३६) रा. स्वातंत्र्य चौक संगमनेर, ऋषी संतोष आव्हाड (वय २४) रा. शिवाजीनगर संगमनेर, अनिकेत चंद्रकांत खोजे (वय २२) रा. गणेशनगर संगमनेर, जयनेश धर्मेंद्र शहा (वय २८) रा. बाजारपेठ संगमनेर, सागर मोहन पंजाबी (वय ३०) रा. विद्यानगर संगमनेर, प्रसाद मयय्या गुंडेला (वय ३१) रा. इंदिरानगर संगमनेर या नऊ तरुणां विरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे गुन्हा नोंदविला आहे

पोलीस नाईक शंकर संपत चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून शहर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ९७१/२०२२ सिगारेट व तंबाखू उत्पादने( जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापारी व वाणिज्य व्यवहार उत्पादन व पुरवठा व वितरण) अधिनियम २००३ चे सुधारित अधिनियम २०१८ कलम ४ व २१ (१) प्रमाणे दाखल केला असून अधिक तपास पोलीस नाईक उगले करत आहेत.

      

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button