इतर

सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकर मदत द्यावी : सभापती काशिनाथ दाते सर


दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी


दैठणे गुंजाळ ता. पारनेर येथील ३५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन सभापती काशिनाथ दाते सर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब तांबे होते.
शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भाई भोसले, पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरराव नगरे, मा. सरपंच सुभाष दुधाडे, दैठणे गुंजाळ चे सरपंच पै. बंटी गुंजाळ, शिवसेना उपतालुका प्रमुख पप्पु बांगर प्रमुख उपस्थितीत होते.
यावेळी बोलताना सभापती दाते सर म्हणाले या गावचे सरपंच पै. बंटी गुंजाळ व त्यांचे सहकारी तसेच येथील संतोष गुंजाळ, शिवसेनेचे पदाधिकारी यांनी माझ्याकडे कामाची मागणी केली. सरपंच स्वतः मला तीन चार वेळा जिल्हा परिषद मध्ये काम मागण्यासाठी आले होते. आणि शेवटच्या टप्प्यात दैठणे गुंजाळ ते वडगाव आमली रस्ता, श्री खंडेश्वर देवस्थान साठी सभामंडप, आणि आरोग्य उपकेंद्र पेव्हींग ब्लॉक बसवणे असा ३५ लक्ष रुपयांचा निधी या गावच्या विकासासाठी उपलब्ध करून दिला. जिल्ह्याचा सभापती असताना सर्व सदस्यांना निधी देऊन, पारनेर तालुक्यात सर्वात जास्त निधी उपलब्ध करून दिला मी तालुक्यात कधीही पक्षीय राजकारण केले नाही. पक्ष कुठलाही असला तरी गावचा विकास करणे माझे लक्ष आहे. संधी मिळाल्यानंतर शासनाचा निधी हा विकासासाठी वापरायचा, हेच जिल्हा परिषद मध्ये काम करत असताना माझा विचार होता. माझ्या सभापती पदाच्या कार्यकाळ काळात मी तालुक्यात असे एकही गाव नाही ज्या कार्यकर्त्यांनी मागणी होती आणि तेथे निधी दिला नाही. मला संधी महाविकास आघाडीमुळे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि विजयराव औटी यांच्यामुळे मिळाली. आज सरकार बदलले आहे किती दिवस राहील माहित नाही. संधीचा उपयोग तालुका विकासासाठी केला. अवकाळी पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे ही जवळपास चालू आहेत आता सरकारने निर्णय घेणे गरजेचे आहे. आणि सरकारला नुकसान भरपाई ही द्यावीच लागेल कारण शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. आपण कार्यक्रमाला आम्हाला बोलावले, आमचा मान सन्मान केला सर्वांना खूप खूप धन्यवाद!
यावेळी शिवसेना जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, सभापती बाबासाहेब तांबे, शंकरराव नगरे, सुभाष दुधाडे, पप्पू बांगर, डॉ. संतोष गुंजाळ यांनी मनोगत व्यक्त केले. यामध्ये लेखाशिर्ष ३०५४ अंतर्गत दैठणे गुंजाळ ते वडगाव आमली रस्ता (ग्रामा-४) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे – १५ लक्ष रू, “क” वर्ग तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत श्री खंडेश्वर मंदिर देवस्थान भक्त निवास बांधणे – १५ लक्ष रू, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पेव्हिंग ब्लॉक बसवणे – ५ लक्ष रू या कामांचा समावेश आहे.


: दाते सरांचे आणि आमच्या कुटुंबाचे घरगुती संबंध आहेत, आम्ही नातेवाईक आहोत, त्यांच्याकडे गावच्या विकासासाठी निधी मागितला आणि त्यांनी तात्काळ त्यास मंजुरी दिली. विकासाची दूरदृष्टी व सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची कसब त्यांच्याकडे आहे

पै. बंटी गुंजाळ, सरपंच दैठणे गुंजाळ.


यावेळी ग्रामपंचायत सदस्य पोपट जासूद, मल्हारी गुंजाळ, साहेबा गुंजाळ, डॉ. संतोष गुंजाळ, नामदेव भाऊ गुंजाळ, शिवराम भाऊ गुंजाळ, चेअरमन भाऊसाहेब गुंजाळ, दत्तोबा जासूद, ग्राम. सदस्य लताबाई गुंजाळ, जया जासूद, संजय आंग्रे, आर.एम. झावरे, व्हा. चेअरमन अनिल पाटील गुंजाळ, भाऊसाहेब गुंजाळ, हरिदास गुंजाळ, संतोष जासूद, खंडू गुंजाळ, दत्ता नाना येवले, विकास गुंजाळ, प्रताप झांबरे, दादा पाटील गुंजाळ, जयश्री कळमकर, कळमकर कोमल, गुंजाळ वैशाली कैलास, गुंजाळ प्रतीक्षा बाबासाहेब, सुलोचना अशोक गुंजाळ, हिराबाई भानुदास गुंजाळ, ताराबाई संभाजी गुंजाळ, भुजबळ बबई रावसाहेब, भुजबळ मंगल अनिल, दहिवळ लक्ष्मी रजनीकांत, गुंजाळ सुरेखा अजिंक्य, कळमकर संगीता अण्णासाहेब, घोलप हेलन सुभाष, दहिवळ मीराबाई भगवान, औटी वैजंता, नंदाबाई कळमकर, अनुसया कळमकर, प्रियंका येवले, जाधव कोमल प्रवीण, दिपाली रवींद्र जाधव, अनिता कळमकर, आकांक्षा कळमकर, जयाबाई गुंजाळ, शाकुबाई कळमकर, जिजाबाई औटी, वैशाली दहिवळ, कांचन जाधव, वर्षा गुंजाळ, विशाल नगरे, पांडुरंग आग्रे, दामाजी येवले, भिकाजी येवले, शिवाजी उमाजी येवले, बापू रेवजी येवले, संपत रोहोकले, बाबाजी बांगर, कामाचे ठेकेदार इंजि. फारुख सय्यद, इंजि नागेश रोहोकले, इंजि. प्रतीक दुधाडे इ. मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. एम. झांबरे यांनी केले तर आभार नामदेव गुंजाळ यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button