संगमनेर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवू — अनिल नागणे

संगमनेर/प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा संगमनेर च्या वतीने तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्न संदर्भात व नूतन गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांच्या स्वागतासाठी गट विकास अधिकारी यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. या बैठकीत गट विकास अधिकारी अनिल नागणे यांनी प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न समजून घेतले व त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी शिक्षण विभागाला सुचित केले.
संगमनेर तालुक्यात नव्याने रुजू झालेले गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब गुंड यांचा सन्मान शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आला. यावेळी संच संच मान्यता त्रुटी दूर करणे,बदली झालेल्या शिक्षकांचे सेवा पुस्तके अद्यावत करणे, वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविणे, वैद्यकीय बिले अनियमियता दूर करणे, कार्योत्तर परवानगी मंजूर करणे, शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी व आठवी प्रशिक्षण आयोजित करणे. इत्यादी विषयावर सकारात्मक चर्चा झाली. चर्चेमध्ये गटशिक्षणाधिकारी सुवर्णाताई फटांगरे, जिल्हा उच्च अधिकार समितीचे अध्यक्ष आर.पी.राहणे, सोमनाथ घुले, बाळासाहेब गुंजाळ, संजय आंबरे, नामदेव शेंडगे,माजी केंद्रप्रमुख अर्जुन वाघ,रामदास मोरे शिक्षण विभाग कार्यालय लिपिक प्रदीप कुदळ,संदीप मंडलिक यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव,विकास मंडळाचे माजी अध्यक्ष भाऊ ढोकरे, भीमराज उगलमुगले,मच्छिन्द्र घुले,विलास शिरोळे,बाळासाहेब मोरे,
गवनाथ बोऱ्हाडे,भाऊसाहेब एरंडे,मच्छिंद्र ढोकरे,शिवाजी आव्हाड, निलेश देशमुख, रवींद्र भालेराव
व अशोक शेटे उपस्थित होते.