जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची हिवरे बाजार ला सभा – जिल्हाध्यक्ष अभय गट

अहमदनगर दि ३
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची राज्य केंद्रीय कार्यकारणी सभा रविवार दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी आयोजित केली आहे
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी यांची राज्य केंद्रीय कार्यकारणी ची सभा रविवार दिनांक ४ डिसेंबर २०२२ रोजी आदर्श गाव हिवरे बाजार ता. जि. अहमदनगर येथे ग्रामीण पर्यटन, प्रशिक्षण केंद्र युनियनचे राज्य अध्यक्ष श्री. बलराज मगर यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेली आहे. सदच्या मीटिंग करिता राज्यभरातून संघटनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तसेच सदर सभेत सन्माननीय श्री पोपटराव पवार यांना भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने राज्य कार्यकारणीचे वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.
सदर मिटिंग मध्ये जिल्हा परिषदेच्या सुधारित आकृतीबंध, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी पदोन्नती स्तर कमी करणे, सेवानिवृत्त कर्मचारी यांना प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेपर्यंत निवृत्तीवेतन देणे, जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करणे व मागील दीड दोन वर्षापासून मुख्य प्रलंबित असलेल्या मागण्यांबाबत शासनाकडून दखल घेतली जात नसले कारणाने आंदोलनाचे धोरण ठरवणे याबाबत चर्चा होणार आहे.
सदरच्या सभेकरीता जिल्हा परिषदेच्या युनियनच्या सभासदांनी व विविध संवर्गाच्या कर्मचाऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युनियनचे राज्य उपाध्यक्ष श्री. सुभाष कराळे, जिल्हा अध्यक्ष श्री. अभय गट, जिल्हा सचिव श्री मनोज चोभे व युनियनच्या सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.