इतर

देवीभोयरेत उद्या शेतकरी कामगार महासंघाची बैठक … !


दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर कारखाना बचाव समितीच्या वतीने उद्या देवीभोयरे येथील ग्रामदैवत अंबिका माता मंदिर सभागृहात महाराष्ट्र शेतकरी कामगार महासंघाची बैठक आयोजित करण्यात आली आहे .

रविवार सकाळी ९ : ३० वा या बैठकीला महासंघाचे संस्थापक लातुरचे माजी आमदार कॉम . माणिकराव जाधव मार्गदर्शन करणार आहेत . माणिकराव जाधव यांनी महाराष्ट्र राज्‍यातील विक्री झालेल्या सहकारी साखर कारखानदारीच्या पुनर्जीवनासाठी एका मोठ्या न्यायालयीन लढाईला सुरूवात केलेली आहे . आता या लढाईला यश मिळत आहे . या न्यायालयीन लढाई साथ म्हणुन बरोबर जनतेच्या आंदोलनाचाही रेटा असावा . म्हणून ते जनजागृती साठी महाराष्ट्र दौरा करत आहेत . त्याची सुरवात उद्या देवीभोयरे येथून होत आहे .


पारनेर साखर कारखाना विक्री झालेला गैरव्यवहार व मुंबई उच्च न्यायालयात याबाबत चालु असलेल्या घडामोडी या विषयी ते तालुक्यातील ऊस उत्पादक , सभासद , कामगार यांच्याशी चर्चा करणार आहेत .
राज्य सहकारी बॅकेचा कारखाने विक्रीतील मोठा घोटाळा त्यांनी उघड केला आहे . याविषयी ते आपली भुमिका मांडणार आहेत.
पारनेर सहकारी कारखान्याचे पुनर्जीवन करण्याचे काम पारनेर बचाव समितीने हाती घेतले आहे . त्यावरही ते मार्गदर्शन करणार आहेत . कारखाना विक्री झाल्यानंतर नोकरी गमावलेले कामगार , त्यांची थकीत पगार देणी , व कवडीमोल किमतीत कारखान्याला जमीन देणार्‍या शेतकर्‍यांशी ते संवाद साधणार आहेत . तरी पारनेर तालुक्यातील शेतकरी , कामगार , सभासद यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button