शेनीत येथे शून्य सर्पदंश मृत्यू अभियान व जनजागृती मोहीम

अकोले प्रतिनिधी
मद्रास क्रोकोडाइल बँक ट्रस्ट चेन्नई आणि रुरल युथ डेव्हलपमेंट एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय ठोकळवाडी शेणीत तालुका अकोले येथे शून्य सर्पदंश मृत्यू अभियान व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. यामध्ये शाळा, कॉलेज, महाविद्यालय, ग्रामपंचायत, शेतकरी गट, महिला बचत गट यांच्या समावेत सदर उपक्रम राबविण्यात येत आहे.
आपल्या परिसरातील सापांची ओळख आणि सर्पदंश अपघात टाळण्यासाठी बचावात्मक उपाय याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. संस्थेचे संचालक सर्पमित्र विवेक दातीर सर व हर्षवर्धन शेटे सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री दातीर सर, जाधव सर, नवले सर ,बेनके सर, बडे सर तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री गभाले सर, अरुणा भांगरे मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
