शेवगाव तालुक्यात दोन तरुणांचा संशयास्पद मृत्यू

शेवगाव प्रतिनिधी
: शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील प्रत्येकी एक अश्या दोन युवकांचा संशयास्पद मृत्यू झाला असून याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अद्याप मृत्यूचे स्पष्ट कारण समजू शकले नाही. सदरची घटना गुरुवार रोजी घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. वैभव बाबासाहेब बिडकर( वय २८) रा. आखेगाव ता. शेवगाव तर कृष्णा बबन काकडे (वय ३० ) रा. सोमठाणे ता. पाथर्डी अशी मृत्यू झालेल्या युवकांची नावे आहेत.
यातील एका युवकाचे नगर येथील जिल्हा रुग्णालयात तर दुसऱ्याचे शेवगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून शविच्छेदन अहवाल अद्याप येणे बाकी असल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार बाळासाहेब ताके हे करीत आहेत.
दिवसभर शेतात पिकावर फवारणीचे कामं करत श्रमपरिहार करण्यासाठी शेतात बसले असता गावठी दारु अथवा विषारी द्रव्य पोटात गेल्याने यां तरुणांना आपला प्राण गमवावा लागला असण्याची शक्यता परिसरात बोलली जाते आहे पोलीस तपासात फॉरेन्सिक अहवालात व सखोल तपासात मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल