पोखरी गावातील कुटुंबांना वाऱ्यावर सोडणार नाही !
आ.निलेश लंके

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
पोखरी तालुका पारनेर येथील ग्रामस्थांना गायरानावरील अतिक्रमणे हटविण्यासाठी आलेल्या नोटिसीमुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे .सदर गावातील ग्रामस्थांनी शुक्रवारी आमदार निलेश लंके यांची भेट घेत सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला व त्या आशयाचे निवेदनही आमदार निलेश लंके यांना देण्यात आले .
पोखरी ता. पारनेर येथील शासकीय जमीनीवरील अतिक्रमणे निष्काषित करणेबाबत शासकीय गायरानवरील अतिक्रमणे निष्काषित करणेसाठी आदेशीत केले आहे.शासकीय जमीनीवर बेकायदेशीर रित्या अतिक्रमण करून अनधिकृत भोगवटा आहे असे दिसून आलेले आहे.अशा आशयाच्या नोटीस पोखरी येथील ग्रामस्थांना दिल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
अतिक्रमण करण्यात आले असेल त्या बाबतील किंवा सक्षम प्राधिका-याच्या मंजुरीशिवाय, अशा जमिनीवर वस्तू फेरीने विकण्याच्या किंवा विक्री करण्याच्या प्रयोजनासाठी उपयोगात आणल्या जाणा-या कोणत्याही क्षेत्राचा मा. जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी उक्त कायदयाचे कलम 13 अन्वये तहसिलदार पारनेर यांना दिलेले आहेत.असे सदर नोटीस मध्ये नमूद केलेले आहे सदर क्षेत्रावरील वापर हा कायदेशीर असलेबाबतचे कागदपत्र या कार्यालयास दिनांक १८/११/२०२२ पर्यंत सादर करावे. असे पुरावे सादर न केल्यास सदरील शासकीय जमीनीवरील अतिक्रमण मुदतीत स्वखर्चाने निष्कासित न केलेस शासकीय यंत्रणेद्वारे दिनांक २८/११/२०२२ रोजी किंवा त्यापूर्वी अतिक्रमण निष्कासित करणेत येईल व अतिक्रमणास आपण कारणीभूत असलेने शासकीय नियमाप्रमाणे अतिक्रमण निष्कासित करणेसाठीचा खर्च आपणाकडून जमीन महसूलाची थकबाकी म्हणून वसूल करणेत येईल.असे या नोटीस मध्ये नमूद केले आहे .सदर नोटीसीमुळे पोखरी व पोखरी परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सदर गावातील लोकांनी आमदार निलेश लंके यांची भेट घेऊन आपल्या मनातील भीती व्यक्त केली व त्या आशयाचे निवेदनही आमदार निलेश लंके यांना देण्यात आले .
एकीकडे आपण एखादे कुटुंब उभे राहण्यासाठी प्रयत्न करतो तर दुसरीकडे अशा निकालामुळे सर्वजण अडचणीत येत आहेत त्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत त्यामुळे राज्य शासनाला फेर याचिका दाखल करण्यास भाग पाडू असे आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिले .
पोखरी तालुका पारनेर येथील दोनशे कुटुंबांना तहसीलदारांनी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे स्वतःहून काढून घेण्यासंदर्भात नोटिसा बजावले आहेत या संदर्भात पोखरी गावचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे व साहेबराव करंजेकर यांच्या माध्यमातून अनेक कुटुंबांना एकत्रित करून आमदार निलेश लंके यांना निवेदन दिले .
या वेळी आमदार निलेश लंके म्हणाले की मी कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार आहे मी तुमच्या बरोबर आहे काळजी करू नका . मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही . तसेच एक घर काय घराची एक वीट सुद्धा पाडू देणार नाही व राज्य शासनाला हा निर्णय मागे घेण्यासाठी भाग पाडू असे आश्वासन दिले .
यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब शिंदे सरपंच सतीश पाटील ग्रामपंचायत सदस्य नामदेव करंजेकर ग्रामपंचायत सदस्य रामदास पाटील साहेबराव करंजेकर माजी चेअरमन अण्णासाहेब पवार माजी चेअरमन अशोक पाटील पंडित पवार अशोक आहेर सिताराम पवार विकास शिवले माजी सरपंच एकनाथ पवार माझी चेअरमन यादवराव फरतरे कासम मोमीन रफिक पटेल माजी चेअरमन निजामभाई पटेल पोपट कसबे बाळू कांबळे रवी मैड रावसाहेब कुंडलिक पवार बाळू सावळेराम शिंदे ग्रामपंचायत सदस्य अशोक खैरे रोहिदास शिंदे भिमाजी खैरे बबन शिवले कुंडलिक शिवले मताजी पवार विनायक शिंदे माणिक फरतरे संदीप खैरे दिलीप फरतारे रितेश फरतरे अशोक कारभारी पवार अनिल कसबे मुनावर सय्यद विठ्ठल खामकर योगेश पवार अशोक करंजेकर भाऊ चौधरी माताजी करंजेकर शिवाजी बर्डे अनुसया फडतारे कलुबाई फरतरे ताराबाई आहेर सुरेखा कुटे आदी उपस्थित होते