राम साबळे व आम्रपाली शेंडगे राष्ट्रीय स्पर्धेत द्वितीय

अहमदनगर :- इंडियन ऑर्थोडोंटिक सोसायटी द्वारे विविध राष्ट्रीय स्पर्धा दिनांक १ ते ७ ऑक्टोंबर २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. यशवंतराव चव्हाण दंत महाविद्यालय, अहमदनगर येथील बीडीएस चतुर्थ वर्षातील विद्यार्थी राम साबळे आणि विद्यार्थीनी आम्रपाली शेंडगे यांनी Inspiring wire bending (Pertaining to Orthodontics and Dentist) या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावरील द्वितीय क्रमांक मिळविला.
दंत महाविद्यालयाच्या डीन डॉ.निलिमा राजहंस यांच्या हस्ते राम व आम्रपाली यांचा सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील प्राध्यापक विभाग प्रमुख डॉ तुषार पाटील व शिक्षक डॉ. अभिजित मिसाळ, डॉ.अविनाश महामुनी, डॉ.राजलक्ष्मी राय, डॉ.रेयाली गाजरे, डॉ.कंचन मेंघाणी यांनी या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.