अहमदनगर

निघोज येथील मळगंगा पतसंस्थेच्या विरोधातील उपोषण स्थगित …

दत्ता ठुबे/पारनेरप्रतिनिधी

: निघोज येथील मळगंगा सहकारी पतसंस्थेच्या विरोधात विविध मागण्यासाठी सुरू केलेले उपोषण स्थगित करण्यात आले .

याबाबत अधिक माहिती की निघोज येथील
बबन कवाद व भानुदास साळवे यांनी मळगंगा संस्थेच्या अनागोंदी कारभार व थकीत कर्जदारांना पाठीशी घातल्या मुळे संस्थेचा ताळेबंद अडचणीत येवू शकतो या कारणावरून उपोषण पुकारले होते .तसेच मळगंगा पतसंस्थेने पारनेर सहकारी साखर कारखान्याला सन २००४ मध्ये कारखान्याच्या पेट्रोल पंपाला साठ लाख रुपयांचे कॅश क्रेडिट कर्ज दिले होते . पुढे कारखाना अवसायनात गेल्यामुळे हे कर्ज थकीत झाले . त्यानंतर या कारखान्याची विक्री झाली . त्यावेळी पारनेर कारखान्याच्या मालमत्तेवरील सर्व कर्ज देणी भागवण्याची जबाबदारी खरेदीदाराची राहील अशी अट निविदेत होती . अशी अट असताना मळगंगेचे कर्ज कारखाना खरेदीदार क्रांती शुगर यांनी चुकते न करता मालमत्तेचे बेकायदेशीर हस्तांतरण केले होते . यावर पतसंस्थेने आक्षेप घेतला असता संस्थेला त्यांचे कर्ज फेडण्याचे तोंडी आश्वासन देण्यात आले होते . पुढे हे आश्वासन न पाळल्यामुळे संस्थेने पुन्हा कारवाईचा बडगा उगारला . त्यानंतर हे कर्ज वर्षभरात व तिमाहीप्रमाणे चार टप्यात फेडण्याचा मळगंगा पतसंस्था व क्रांती शुगर यांच्यात सन २०१८ ला लेखी करार झाला . परंतु हा करार देखील क्रांती शुगर यांनी पाळला नाही . असे असताना मळगंगा पतसंस्था क्रांती शुगर यांच्यावर मेहरनजर होत होती व कारवाईस टाळाटाळ करीत होते . त्यामुळे संस्था अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली होती म्हणून संस्थेचे सभासद बबन कवाद व भानुदास साळवे यांनी
संस्थेकडे क्रांती शुगर च्या कर्ज वसुलीची मागणी केली परंतु त्यास संस्थेकडून प्रतिसादात मिळत नव्हता . म्हणून त्यांनी हे उपोषण पुकारले होते .
त्यांनी पारनेर येथील सहकार सहायक निबंधक कार्यालया समोर उपोषण चालु केल्यानंतर संस्थेने त्यांच्या मागणीप्रमाणे निर्णय घेतल्याने उपोषण स्थगित करण्यात आले .

  • पारनेर कारखान्यासाठी महत्वाचा निर्णय … !
  • पारनेर कारखान्याकडे १४० एकर जमीन आज रोजी शिल्लक आहे . ती मळगंगा संस्थेने कर्जामुळे जप्त केली होती . कारखाना विक्री करारानुसार ते कर्ज फेडण्याची जबाबदारी क्रांती शुगर यांची असल्याने आमची संस्था त्यांचेकडून वसुल करील व पारनेरची १४० एकर जप्त केलेली जमीन
  • पुन्हा कारखान्‍याला देण्यात येईल असा निर्णय घेतला आहे . व तसा ठराव संचालक मंडळाने घेतला आहे .त्यामुळे संस्थेच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो व उपोषण स्थगित करत आहोत .
  • भानुदास साळवे,बबन कवाद
  • उपोषणकर्ते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button