बोटा येथील पत्रकार सुरेश टंकसाळे यांचे निधन

संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील बोटा येथील जेष्ठ पत्रकार व वृतपत्र विक्रेते सुरेश टंकसाळे(वय ६०) यांचे बुधवार दिनांक २३ नोव्हेंबर रोजी दुःखद निधन झाले आहे.
ग्रामीण भागात वर्तमान पत्र विक्रेते म्हणून काम करतांना त्यांनी पत्रकारिता अधिक रुजवली. बोटा गावात पोस्ट खात्यात काम करता करता वर्तमान पत्राचे कामही यशस्वीपणे पार पाडले .कुटूबांची जबाबदारी पार पाडताना त्यांनी समाजातील प्रश्नाना वाच फोडली. जून्या काळात संघर्ष करत त्यांनी प्रगती साधली.अनेक वर्तमान पत्रात त्यांनी वार्ताहर म्हणून काम पाहिले.गेली अनेक वर्षे बोटा पोस्टात यशस्वी पणे काम केल्या नंतर त्यांना संगमनेरच्या पोस्टात देखिल काम करण्याची संधी मिळाली होती ते तेथेच सेवा निवृत्त झाले.सध्या ते गावातच राहत होते,टंकसाळे यांनी पत्रकार ते पेपर वितरक म्हणून गेले अनेक दिवस काम केले आहे तसेच त्यांनी डाक विभागात नोकरी केली होती. तर काही दिवसांपूर्वी मुलाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले होते.तर मुलाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन ते खचले होते. वृतपत्र विक्रेते ते पत्रकार हा त्यांचा प्रवास मोठा होता