अकोल्यात होणार जिल्हास्तरीय कुस्त्यांचा थरार!

अकोले प्रतिनिधी-
अकोले तालुका तालीम संघ यांच्या वतीने आणि अनुसूचित जन जाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले मध्ये दि.27 व 28 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र केसरी निवडीसाठी जिल्हास्तरीय भव्य कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अकोले तालुका तालीम संघाचे तालुकाध्यक्ष बबलूसेठ धुमाळ व उपाध्यक्ष शामराव शेटे यांनी दिली.
या कुस्ती स्पर्धेचे उदघाटन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांचे हस्ते व माजीमंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी आ.प्रा.राम शिंदे, भाजप अहमदनगर जिल्हा तालीम संघ अध्यक्ष वैभव लांडगे भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर,मा.खासदार भाऊसाहेब वाकचौरे,खासदार सदाशिवराव लोखंडे,श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक,अहमदनगर,एस.झेड .
देशमुख सर,ऍड.श्रीराम गणपुले,जेष्ठ शेतकरी नेते दशरथराव सावंत, बी.जे.देशमुख,पोलीस निरीक्षक मिथुन घुगे,गोरक्षनाथ बलकवडे,भाजप उप जिल्हाध्यक्ष गिरजाजी जाधव,जेष्ठ नेते शिवाजीराजे धुमाळ,लिज्जत पापड चे कार्यकारी संचालक सुरेशराव कोते,जि.प.गटनेते जालिंदर वाकचौरे, अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष ऍड के.डी.धुमाळ,भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, अमृतसागर दूध संघाचे व्हा.चेअरमन रावसाहेब वाकचौरे, तालुका सरचिटणीस यशवंतराव आभाळे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष इंजि.सुनील दातीर,सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, नगराध्यक्ष सौ.सोनालिताई नाईकवाडी, उप नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, उद्योजक राजाभाऊ गोडसे, भाजप युवा मोर्चा तालुकाध्यक्ष राहुल देशमुख ,तालीम संघाचे जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे,जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे तालीम संघाचे तालुकाध्यक्ष,आदींसह अकोलेचे सर्व पैलवान,नगरसेवक व अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे साठी यंदा खुल्या पध्दतीने निवड केली जाणार आहे.अहमदनगर जिल्ह्यातुन महाराष्ट्र केसरी साठी निवड करण्यासाठी या स्पर्धा दि 27 व 28 नोव्हेंबर रोजी अकोले शहरात होणार असून यामधून गादी आणि माती विभागात या निवडी केल्या जाणार आहेत. दि.27 रोजी गादी विभाग व दि.28 रोजी माती विभागासाठी स्पर्धा होणार आहेत.
या पूर्वी तालुक्यातच मल्ल भिडायचे.त्यामुळे एखादा चांगला मल्ल असेल तर तो तालुक्यातच पराभूत झाला तर त्याला पुढे संधी मिळत नसे.त्यामुळे या वर्षी खुल्या पध्दतीने निवड चाचणी स्पर्धा ठेवल्यामुळे सर्वाना समान संधी मिळणार आहे.
निवड चाचणीमध्ये वरिष्ठ विभागातीलजिल्ह्यातील सर्व खेळाडूंना यात सहभागी होता येईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तालुका तालीम संघाच्या तालुकाध्यक्षांच्या सहीचे ओळखपत्र बंधनकारक आहे. या स्पर्धेचे सर्व आयोजन व नियोजन जिल्हाध्यक्ष वैभव लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष बबलू धुमाळ व त्यांचे सर्व सहकारी हे करणार आहेत. या कुस्ती स्पर्धेचे निवेदक 32 वर्षे 4000 मैदाने आपल्या आवाजाने गाजविणारे कुस्ती निवेदक कोल्हापूर येथील पै.शंकर अण्णा पूजारी हे करणार आहेत.
महाराष्ट्र केसरी गटासाठी एक गट आहे, त्या शिवाय 57,61,65,70,74,79,86,92,97 या गटामध्ये स्पर्धा होणार आहे. वजनासाठी वेगवेगळी वेळ निश्चित केलेली आहे.गादी विभागातील निवड चाचणी दि.27 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 ते 11.30 तर माती विभागातील निवड चाचणी दि.28 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता सुरू होईल.