गणोरे येथील अंबिका माता यात्रा उत्सव संपन्न!

गणोरे प्रतिनिधी :- (सुशांत आरोटे)
संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली अंबिका माता यात्रा उत्सव गणोरे ता.अकोले मोठ्या उत्साहात सुरू असून लाखो भाविकांनी आता पर्यंत दर्शन घेतले आहे अजूनही मोठ्या संख्येने भाविक सध्या महाराष्ट्र भारतून यात्रेकरिता येत आहे.
महाराष्ट्रात नावाजलेले रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य तमाशा मोठ्या उत्साहात पार पडला.मोठ्या प्रमाणावर भाविकांनी या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला.तसेच हीवरगव ग्रामस्थांच्या वतीने तकतराव मिरवणूक मोठया उत्साहात मिरवणुकीने आणत यात्रेची शोभा वाढवली.रात्रीच्या वेळेस शोभेच्या दारूची आतषबाजी बघण्यासारखी होती. यंदाच्या वर्षी गर्दीने सर्वच उच्चांक मोडीत काढले. संगमनेर -गणोरे-अकोले रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.परंतु अकोले पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस उपनिरीक्षक हांडोरे,पोलीस कर्मचारी घुले,बडे,इतर पोलीस कर्मचारी आणि गावातील युवक,विश्वस्त,नागरिक मोठ्या प्रमाणावर वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मदत करत होते.आज पर्यंतची सर्वात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परंतु पोलीस व नागरिकांनी वाहतूक सुरळीत होण्याकरिता मदत केली.
ह्या वर्षी यात्रेने जवळपास तालुक्यातील सर्वच यात्रेच्या गर्दीचा उच्चांक मोडीत काढला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेक भाविक भक्तांनी दर्शन घेतले, यात्रेतील छोटे मोठे सर्वच दुकानदार सांगत होते की,यंदाच्या हंगामात अशी गर्दी क्वचितच पाहायला मिळाली.आमचं माल ही संपला,अश्या प्रतिक्रिया मधून मधून येत होत्या.
दरम्यानच्या काळात या अंबिका माता यात्रा उत्सवास भेट देण्यासाठी शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खासदार सदाशिव लोखंडे,अकोले तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉ किरण लहामटे, माजी आमदार वैभव पिचड,तसेच अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी अधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी हंगामासाठी महाराष्ट्रभरातून अनेक पैलवान आले होते. जवळपास लाख भर लोकांनी यात्रा उत्सव निमित्ताने भेट दिली असल्याची माहिती विश्वस्त मंडळ यांनी दिली. यात्रा उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी विश्वस्त मंडळ,ग्रामपंचायत गणोरे,ग्रामस्थ,तरुण मंडळे,तसेच दक्ष पोलीस मित्र संघटनेच्या मित्रांनी,आदींनी मदत केली. किरकोळ अपवाद वगळता यात्रा उत्सव शांततेत पार पडली.अकोले पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे,पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवला होता.
