रामनाथ भोजने यांना संविधान सैनिक पुरस्कार !

कल्याण दि.26
संविधान सैनिक संघ आणि डॉ मित्र चारिटेबलं ट्रस्ट यांच्या संयुक्त संस्थे तर्फे डी एम सी टी हॉस्पिटल, कल्याण पूर्व येथे संविधान दिना निमित्त आयोजित केलेल्या मेळाव्यात संविधान सैनिक पुरस्कार जाहीर करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ रवींद्र जाधव होते.
सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपास्थित होते. या प्रसंगी अभिनेते अरुण नलावडे म्हणाले की, जगात चांगल घडत असत तेव्हा वाईट सुद्धा घडत असत. वाईटातून चांगलं घडविण्याच काम डॉ रवींद्र जाधव व डॉ सुरेखा जाधव हे नवीन पिढीतून सुजाण नागरिक घडविण्याच काम संविधान प्रचार माध्यमातून करत आहेत. प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना नुरखा पठाण म्हणाले की, संविधान दिन हा मानवाधिकार दिन झाला पाहिजे. भारतात 650 जाती आहेत. प्रत्येक जात एक दुसऱ्याला कमी लेखते त्यामुळेच जेवढ्या जाती तेवढे राष्ट्र असे समीकरण आहे त्या सर्वाना संविधानाने एकत्रित जोडले आहेत.
या प्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान चिन्ह देऊन अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुप्रसिद्ध गायक संगीतकार दत्ता जाधव, डॉ बी आर आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल हंडोरे, प्रसिद्ध सर्जन डॉ अरुण माने, शिवसेना शाखा प्रमुख मनोज खरात, वंचित बहुजन आघाडीचे मिलिंद खरे, रोटरी क्लब अध्यक्ष राजेश कदम, संविधान सैनिक संघाच्या अध्यक्षा सुनीता खैरनार, सचिव सीमा चक्रे, नाट्य कलाकार करुणा कातखडे, प्रवासी संघटनेच्या अरुणा गोफणे, लेखिका डॉ चित्रलेखा कळंबे आदी 50 हुन अधिक समाजसेवकांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष रामनाथ भोजणे यांची संविधान सैनिक संघाच्या अध्यक्षपदी तर राजेंद्र वाघमारे यांची सचिव म्हणून एक वर्षासाठी निवड करण्यात आली. संविधान मेळाव्याला दलित, आदिवासी, बौध्द, मराठा, आगरी आदी समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते त्यांचाही सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
