एल सी बी चे अकोल्यात अवैध दारू ,मटका बुकिंवर छापे !

स्थानिक पोलीस व उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा फाडला बरखा!
अकोले :प्रतिनिधी
‘अकोले’त मटका तसेच अवैध दारुची मोठया प्रमाणात विक्री.होत आहे .स्थानिक पोलिस,आणि दारुबंदी अधिकाऱ्यांच्या ‘अर्थ’पूर्ण तडजोडीने ही अवैध दारू मटका सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या छापा कारवाईने सिद्ध झाले आहे
, नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकांनी अकोले शहर व तालुक्यात एकाचवेळी छापे टाकल्याने अकोले पोलिस आणि उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा बुरखा फाडला आहे तब्बल ११ अवैद्य दारु ठेल्यांसह मटका बुकीवर छापे टाकून कारवाई केली , या धडक
कारवाईमुळे अवैध व्यावसिकांचे धाबे दणाणले. याप्रकरणी १३ जणांविरुद्ध कारवाई करुन, पोलिसांनी सुमारे १ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगतकेला. या धडक कारवाईमुळे ‘स्थानिक गुन्हे च्या पोलिस पथकाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे अकोले शहरासह तालुक्यात अवैध दारुसह मटका व्यवसाय सर्रास सुरु असल्याचे वास्तव उघडकीस आणल्यानंतर, या अवैध व्यवसायिकांकडे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करणारे अकोले तील पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांविरुद्ध जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला कोणती कारवाई करणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.अवैध दारूसह मटका बुके पकडले,तेथील विट अंमलदारासह मुळ मालकांविरुद्ध कारवाई करावी. अशी मागणी पुढे आली आहे अकोलेत अवैद्य दारूसह मटका बुकीं वर एलसीबी ची छापा कारवाई होते , मात्र स्थानिक पोलिसांना या अवैध व्यावसायाचा शोध कसा लागत नाही, असा संतप्त सवाल नागरिक आता करू लागले आहे.
हिवरगाव आबेरे येथे पेट्रोल पंपामागे हॉटेल पाटीलवाडा येथे छापा टाकण्यात आला. केशव रामा खोडके (६५, रा. गर्दणी, अकोले) व सचिन जाधव ( रा. नवलेवाडी, ता. अकोले, हा पसार झाला) या दोघांकडे देशी दारुच्या बाटल्या आढळल्या. ४३ सिलबंद बाटल्यांसह ३,०१० रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडून पोलिसांनी हस्तगत केला.
हिवरगाव आंबरे शिवारात पेट्रोलपंपामागे हॉटेल पाटीलवाडाच्या आडोश्याला गोरख ठुबे हा इसम विनापरवाना कल्याण नावाचा हार जितीचा मटका खेळताना खेळविताना रंगेहात सापडला. त्याच्याकडून १५, ८०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. विरगाव फाटा येथील हॉटेल त्रिमुर्ती येथे उत्तम शरद जोरवर (४१, रा. देवठाण, ता. अकोले) याच्याकडून देशी दारुच्या बाटल्यांसह २,९०५ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. दरम्यान, येथील हॉटेल स्नेहभोजन संतोष बाळकृष्ण जाधव (४२, रा. तांभोळ) याच्याकडून ६, ७२० रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. हॉटेल त्रिमूर्तीच्या आडोश्याला संदीप भगवान कर्णिक ( ३५, रा. तांभोळ) हा विना परवाना बेकायदा कल्याण नावाचा हार जितीचा मटका खेळताना खेळविताना १, ८४० रुपायांच्या मुद्देमालासह सापडला.
अकोले बस स्टॅण्डसमोर पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला शाकीर आसिफ शेख (२५, रा. कमान वेस, अकोले) हा
इसम विना परवाना बेकायदा कल्याण नावाचा हार जितीचा मटका खेळताना- खेळविताना रंगेहात सापडला. रोकड व मटका खेळण्याचे साहित्य असा १,७०० रुपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला. लक्ष्मी विलास हॉटेलजवळ पत्र्याच्या टपरीच्या आडोशाला रविंद्र बाळासाहेब गायकवाड (३२, रा. इंदिरानगर) हा इसम कल्याण नावाचा हार जितीचा मटका खेळताना खेळविताना आढळला.
रोकड १,६५० रुपयांसह मटका खेळण्याचे साहित्य त्याच्याकडून जप्त करण्यात आले. अकोले बसस्टॅण्डजवळ धुमाळ संकुलच्या बेसमेंट गाळ्यामध्ये करण दिलीप देवकर (२८) व शोयोब शायर शेख (२७, दोघेही रा. शाहूनगर), बाबा आभाळे व ओंकार जाधव हे विना परवाना बेकायदा बिगो नावाचा हार जितीचा जुगार खेळताना खेळविताना एलईडी स्क्रीनसह २ एन्डॉईड मोबाईल, असा एकूण ८८, ४०० रूपयांचा मुद्देमाल त्याच्याकडून पोलिसांनी जप्त केला. महात्मा फुले चौकात टपरीच्या आडोश्याला सत्तार गफ्फार शेख (३१, रा. कुंभारवाडा) हा इसम कल्याण नावाचा हार जितीचा मटका खेळताना खेळविताना १,६१०रुपयांच्या मुद्देमालासह रंगेहात सापडला. गुजरी मार्केट येथे टपरीच्या आडोश्याला अमोल दिगंबर झोळेकर(३४, रा. धुमाळवाडी) हा इसम हार- जितीचा मटका खेळताना- खेळविताना आढळला. त्याच्याकडून रोकड १,४९० व मटका खेळण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले. घोडसरवाडी येथे टाहकरी रस्त्यालगत टपरीमध्ये दीपक भावका जाधव (४०, रा. समशेरपूर) याच्याकडून ३,०८० रुपयांच्या देशी दारुच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या.
अकोले तालुक्यातील अवैद्य दारू विक्रीसह मटका बुकिं वर जिल्हा गुन्हे शाखेने कारवाई केल्यामुळे स्थानिक पोलिसांची अवैद्य व्यावसायिकांशी ‘अर्थ’पूर्ण मैत्री असल्याचे वास्तव चित्र समोर आले आहे.
————-