
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी
तालुक्यातील जाधववाडी येथे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना तसेच भवानी माता सभामंडप भूमिपूजन समारंभ सुजित झावरे पाटील यांचे शुभहस्ते तसेच भाजपा तालुकाध्यक्ष वसंतराव चेडे यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले.
यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, खासदार सुजय विखे पाटील यांचा माध्यमातून सदर गावाला केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत सदर पाणी योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आले. कोणतेही पद नसताना काम करणे ही फार अवघड गोष्ट आहे. पण तरीही तालुक्यात विकासकामे आणण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो. सत्तेचा वापर तालुक्यातील सर्वसामान्य लोकांच्या प्रश्न सोडविण्यासाठी करणार. यापूर्वी काही महिने अगोदर जाधववाडी गावातील बंधारासाठी निधी मंजूर करून बंधारा पूर्ण करण्यात आलेला आहे. तालुक्यातील विकास कामांसाठी कोणत्याही पदाची अभिलाषा न ठेवता सतेच्या माध्यमातून कामे करत राहणार.
यावेळी सरपंच विठ्ठल शेठ जाधव, उपसरपंच उषाताई जाधव, वेसदरे गावचे सरपंच अनिल तिकोने, मा. सरपंच संतोष जाधव, भाजपा शहराध्यक्ष किरण कोकाटे, अमोल मैड, रविंद्र पाडळकर, बाबासाहेब चेडे, किशोर तिकोने, मा.सरपंच शालूबाई जाधव, सीताराम जाधव, उमाजी जाधव, ह.भ.प. पांडुरंग जाधव, खंडूजी जाधव, सुदाम जाधव, शंकर जाधव, बाळू जाधव, रावसाहेब जाधव, रामदास सोमवंशी, सखाराम जाधव, पोपट जाधव, पोपट सोमवंशी, यशवंत जाधव, रमेश जाधव, शिवाजी जाधव तसेच ग्रामस्थ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
