राज्यस्तरीय एक पात्री स्पर्धेत देविदास सोहनी प्रथम
संगमनेर प्रतिनिधी
शांती फाउंडेशन च्या वतीने आयोजित राज्यस्तरीय एकापात्री स्पर्धेमध्ये खुल्या गटातून अहमदनगर येथील देविदास सोहनी यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला.
तीन गटांमध्ये एकपात्री स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या शालेय गट महाविद्यालय गट आणि खुला गट या तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली पुरस्कार प्राप्त स्पर्धकांना रोख रक्कम प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन डॉ.सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, माजी,प्राचार्य सुभाष माळवदकर यांच्या उपस्थितीमध्ये बक्षीस वितरण करण्यात आले खुल्या गटामध्ये द्वितीय क्रमांक राधा चव्हाण तृतीय क्रमांक संदीप थिटे उत्तेजनार्थ विजय मांडे आणि मनीषा तायडे यांनी पारीतोषक प्राप्त केले. महाविद्यालयीन गटामध्ये कोमल म्हस्के यांनी प्रथम, अभय कानवडे यांना द्वितीय, सायली गायकवाड तृतीय, प्रीतम वर्पे यांना उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. शालेय गटामध्ये श्रुती मैड प्रथम, स्वरा नाईकवाडी द्वितीय, दिक्षिता नेहूलकर तृतीय ,ज्ञानेश्वर राहणे, शर्वरी सहाने व शरयु शेळके उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले परीक्षक म्हणून दिनेश भाने, सुरेंद्र गुजराती, राजन झांबरे यांनी काम पाहिले. उपस्थिती स्वागत व आभार डॉक्टर सोमनाथ मुटकुळे यांनी मांडले प्रास्ताविक सूर्यकांत शिंदे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील मंडलिक, बटवाल, ज्ञानेश्वर वर्पे ,रवींद्र पगारे, सुनील घुले, रमेश पावसे आदींनी विशेष प्रयत्न केले. पारितोषिक प्राप्त सर्वांचे अभिनंदन होत आहे.