इतर

नेप्तीत मोहरमची विसर्जन मिरवणूक उत्साहात


मिरवणुकीत हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन


अहमदनगर (प्रतिनिधी)-

नेप्ती (ता. नगर) येथे मोहरमच्या दहाव्या दिवशी गावातील नालसाब, इमामी कासम, मौला आली यांच्यासह ताबूतचे धार्मिक वातावरणात विसर्जन करण्यात आले. गावातील मोहरमच्या विसर्जन मिरवणुकीत युवकांसह हिंदू-मुस्लिम समाजातील बांधवांनी सहभागी होवून धार्मिक एकात्मतेचे दर्शन घडविले. या हसन-हुसेनच्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला.
यावेळी माजी उपसरपंच फारुक सय्यद, समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले ,मार्केट कमिटीचे माजी संचालक वसंत पवार ,ग्रामपंचायत सदस्य दादू चौगुले, मौलाना मुनीर सय्यद, प्रा.एकनाथ होले , बाबूलाल सय्यद, सत्तार सय्यद, जावेद सय्यद, जमीर सय्यद, गुलाब सय्यद, हुसेन सय्यद, संतोष चहाळ, अंबादास जपकर, कारभारी जपकर, उमर सय्यद, युनूस सय्यद, नौशाद शेख, सिकंदर शेख, मुख्तार सय्यद, सलीम सय्यद, कय्युम सय्यद, बादशाह सय्यद, वाजिद सय्यद, पै. योगेश पवार, ईजाज सय्यद, अन्सार सय्यद, बबन सय्यद, रंगनाथ जपकर, राहुल गवारे, रफिक सय्यद, आसिफ शेख, नितीन पवार आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.
दरवर्षीप्रमाणे गावातील हिंदू-मुस्लिम युवकांनी एकत्रित येऊन मौलाना मुनीर सय्यद व हुसेन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सवाऱ्यांची स्थापना केली होती. स्थापनेच्या दिवशी नाले हैदर यंग पार्टीच्या वतीने इमामवाडा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच दहा दिवस गावात इमाने हसन-हुसेन यांनी धर्मासाठी दिलेल्या बलिदानाची माहिती देणाऱ्या मजलीसचे आयोजन करण्यात आले होते. मजलीसनंतर भाविकांमध्ये प्रसादचे वाटप करण्यात आले. दहा दिवस गावात धार्मिक वातावरणात मोहरम उत्सव उत्साहात व शांततेत पार पडला
मोहरमच्या आठव्या दिवशी रात्री 12 वाजता सवारीची मिरवणूक काढण्यात आली. नवव्या दिवशी कत्तलच्या रात्री व दहाव्या दिवशी पारंपारिक वाद्यात सवाऱ्यांची मिरवणूक निघाली होती. चौका-चौकात सवारीवर भाविकांनी चादर अर्पण केली. यावेळी भाविकांना सरबतचे देखील वाटप करण्यात आले. पवार मळा येथील विहिरीत सवाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button