अगस्ति महाविद्यालय ग्रंथालयात‘पुस्तक पेढी’ योजनेअंतर्गत मोफत पुस्तकांचे वितरण.

अगस्ति महाविद्यालय ग्रंथालयात‘पुस्तक पेढी’ योजनेअंतर्गत मोफत पुस्तकांचे वितरण.
अकोले /प्रतिनिधी
श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर ट्रस्ट,प्रभादेवी,मुंबई यांच्याकडून बुक बँक योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल,गरजू तसेच ज्या विद्यार्थ्याचे नाव केसरी रेशनकार्डमध्ये आहे विद्यार्थ्यांसाठी ‘पुस्तक पेढी’ योजने अंतर्गत मोफत पुस्तके देण्यात येतात. या वर्षी प्रथमच आपल्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी,संचलित अगस्ति कला,वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाच्या वतीने अशा एकूण 156 विद्यार्थ्यांनी सदर योजनेचे फॉर्म भरले होते त्यांना सदर ट्रस्टकडून रु.3,60,715रकमेची एकूण 1984 पुस्तके मंजूर करण्यात आली.
सदर पुस्तक पेढी (बुक बँक) योजनेअंतर्गत मोफत मिळालेल्यापुस्तकांचा वितरण कार्यक्रम महाविद्यालयातील कै.के.बी.दादा देशमुख सभागृहामध्ये गुरुवारी पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण करण्यात आले. ग्रंथपाल प्रा.प्रदिप बच्छाव यांनी बुक बँक योजनेची सविस्तर माहिती देऊन पुढील वर्षी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.यावेळी प्राचार्य डॉ.भास्कर शेळके यांनी पुस्तके मिळाल्याबद्दल ट्रस्ट च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे विशेष आभार मानले.
अध्यक्षीय मनोगतात संस्थेचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव यांनी सदर पुस्तके अकोले तालुक्यातील गरीब विद्यार्थ्यांसाठी लाभदायी ठरतील. ट्रस्टने यापुढेही आमच्या महाविद्यालयासाठी ‘पुस्तक पेढी’ योजना अशीच चालू ठेवावी असे मत व्यक्त केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.महेजबिन सय्यद यांनी केले तर उपस्थितांचे आभार सहा. ग्रंथपाल डॉ.प्रवीण घुले यांनी मानले.
याप्रसंगी अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख,कार्यकारिणी सदस्य सुधाकर आरोटे,महाविद्यालयाचे वाणिज्य व एन.सी.सी विभागप्रमुख ले.सचिन पलांडे, रजिस्ट्रार सीताराम बगाड, माजी उपप्राचार्य गणपत नवले ग्रंथालय विभागाचे सर्व कर्मचारी तसेच लाभार्थी विद्यार्थी उपस्थित होते.
——————-