इतरग्रामीण

अकोल्यात ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी ! पिचड यांची पीछेहाट!

अकोले प्रतिनिधी

मुदत संपलेल्या अकोले तालुक्यातील 11 ग्रामपंचायत चा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता यापैकी शीळवंडी व सोमलवाडी या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यानंतर रविवारी उर्वरित नऊ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले तालुक्यातील या 9 ग्रामपंचायती साठी सरासरी 80 टक्के मतदान झाले मंगळवारी (दिनांक 20 )रोजी मतमोजणी झाली या निवडणूकित आमदार डॉ. किरण लहामटे, राष्ट्रवादीचे नेते अशोकराव भांगरे ,ज्येष्ठ नेते सिताराम पाटील गायकर यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 8 ग्रामपंचायत वर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा रोवला भाजपचे माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्या समर्थक गटाने 2 ग्रामपंचयती वर आपला झेंडा रोवता आला तर एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली

निवडणुकीत सरपंच पदासाठी ४७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. परंतु २२ उमेदवारांनी सरपंच पदासाठी माघार घेतल्याने 25 उमेदवार सरपंच पदासाठी रिंगणात होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य पदासाठी १९३ पैकी ९२ उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर १०१ उमेदवार ग्रामपंचायत सदस्य पदासाठी निवडणुकीच्या रिगणात होते.

सरपंच पदासाठी सोमलवाडी व शिळवंडी या २ ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. त्याचबरोबर ४१ ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध झाले आहेत.

ग्रामपंचायत निहाय विजय उमेदवार पुढील प्रमाणे

शिळवंडी – सरपंच- पूनाबाई न्यानेश्वर साबळे, दीपक दशरथ साबळे, द्रोपदा कुंडलिक साबळे , मोहना धोंडीबा साबळे, रेश्मा गुलाब साबळे, सुमित्रा विजय साबळे ,संतोष मारुती साबळे ,अनिता उत्तम साबळे ,(सर्व बिनविरोध)

सोमलवाडी -सरपंच- गंभीरे पार्वताबाई कोंडीराम, सरोकते कृष्णा तुकाराम, सारोकते ताराबाई सखाराम, कचरे चंद्रभागा रुपाजी ,गोडे अंकुश निवृत्ती ,गंभीरे फसाबाई सुनील, गंभीरे रामदास विठ्ठल ,गंभीरे मीरा किसन, (सर्व बिनविरोध )

चास – सरपंच -शेळके सुरेखा रामदास (834 ) ,वाडेकर बाबुराव ज्ञानदेव (328), पवार सुवर्णा मोहन (355), शेळके सुनंदा गणपत (380), खैरे नंदा अंकुश( २५५), शेळके सचिन मारुती (२३६), वाकळे इंद्रायणी किरण( 223), शेळके सुनील बबन (301), जाधव नंदिनी वैभव (290), शेळके सविता संदीप (300),

भंडारदरा– सरपंच- खाडे अनिता विनायक( 370 ) ,खाडे योगेश किसन (104 )खाडे द्वारकाबाई वसंत (130), खाडे मीना हनुमंत (124 ),गंगाराम भागा ईदे(157), खाडे बोराबाई गणपत (147), खाडे सुगंधा विठ्ठल (141), खाडे दीपक श्रावणा (149 ),खाडे पोपट शंकर ( बिनविरोध) ,खाडे कल्पना जैन (153)
अंभोळ – सरपंच- खोकले सुनिता जिजाराम (900 ) ,लोहकरे सिताराम सावळेराम (371) साबळे सुनील नाना( 378) मेमाने संगीता सखाराम( बिनविरोध ), साबळे पांडुरंग त्रिंबक (333 ),वाजे सुनिता होनाजी (बिनविरोध), चौधरी सविता तात्याभाऊ (बिनविरोध ), भोजने बाळू नामदेव( 293), भवारी आशा शरद (बिनविरोध), साबळे सुनीता रमेश ( बिनविरोध ),

मुरशेत– सरपंच- अस्वले सखाराम मनोहर( 202 ),अस्वले सोनू संतोष (118), शिंदे स्वाती दीपक( बिनविरोध), डगळे बारकाबाई तुळशीराम (103), अस्वले राजाराम देवजी (122) डोळस मीना अशोक (101 ),उभे संजय अंकुश (बिनविरोध), बांगर संगीता राजू (बिनविरोध),

शेंडीसरपंच- भांगरे वनिता मनोहर (416), मोठे वसंत वाळीबा ,भांगरे मनीषा दयाराम, बागडे किशोरी दिलीप, गांगड अंकुश रामा ,नेवासकर सचिन विश्वनाथ ,भांगरे तानाबाई सुरेश, भांगरे राजेंद्र दगडू ,भांगरे अरुणा भरत ,भांगरे सगुनाबाई नारायण, (सर्व बिनविरोध)

ललित खुर्दसरपंच- गोडसे अनिता किशोर (663), गोडसे राहुल रमेश( 261), गोडसे अनिता लक्ष्मण (262), गोडसे सुरेखा कैलास (255 ),पिंपळे लालू दत्तू (205) गावडे अर्जुन दत्तू ( 214 ) गोडसे लिलाबाई विश्वनाथ (215), गोडसे भारत जगन्नाथ (250) गावडे इंदिरा विठ्ठल( 237), गोडसे मीना अशोक (246),

वाकीसरपंच- झडे राजाराम भगवंत (288) ,हीलम रोहिदास रघुनाथ (93 ), झोले सुशीला श्रावण (111), वैराळ रंजना रामनाथ (बिनविरोध ), भोजने जनार्दन अशोक (111 )सुशीला श्रावण (126 )सगभोर राम सखाराम (132) सगभोर सीमा राम (147)


डोंगरगाव -सरपंच- उगले दशरथ माधव (१२१६), उगले हरिभाऊ निवृत्ती( 174) ,चिकणे उषा अविनाश( 189), उगले प्रतीक शंकर (452), उगले दशरथ दामोदर (386), उगले मनीषा सुरेश (505), पोपेरे सुभाष सोमा (315),
उगले स्वाती माधव (364 ) ,शेळके प्रीती बाळासाहेब( 357 ) ,उगले अमोल रंगनाथ (247) ,माळी कांताबाई सुदाम (बिनविरोध) , आरती विशाल उगले (272)


गुहिरे सरपंच- कातडे गजानन त्रिंबक 231 सरोकते सुनील महादू सरोकते मंगल सुनील, सरोकते बारसाबाई अनिल कैलास हिरामण सोनवणे, सोनवणे वनिता काळू, सोनवणे छगन पोपट ,सोनवणे चंद्राबाई एकनाथ ( सर्व बिनविरोध)

ग्रामपंचायत निहाय एकूण मत दान टक्केवारी आंभोळ (71.93टक्के) भंडारदरा ( 67.04टक्के) चास(83.89टक्के) ,डोंगरगाव (86.41टक्के ) गुहिरे(80.82टक्के) , लहीत बुद्रुक(86.85टक्के) मुरशेत(79.05 टक्के) शेंडी(80.37टक्के) वाकी(74.50टक्के) असे मतदान झाले होते या नऊ ग्रामपंचायत निवडणूकित 11हजार730 एकूण मतदारांपैकी 4949 पुरुष तर 4396 अशा 9345 मतदारांनी निवडणुकीत मतदान केले सरासरी 79.67% मतदान झाले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button