हिवरगाव च्या आदित्य ठुबे चे तालुकास्तर स्पर्धेत घवघवीत यश

जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धे साठी निवड
अकोले प्रतिनिधी
अकोले येथे झालेल्या तालुका स्तरीय मैदानी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल हिवरगाव आंबरे( ता. अकोले) येथील शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले
यामध्ये कु.आदित्य अमोल ठुबे याने 400 मी. धावण्यामध्ये तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून त्याची जिल्हा स्तरावर निवड झाली. त्याचबरोबर कू.प्रतीक्षा बाळासाहेब आंबरे हिने 400 मी.मध्ये तिसरा क्रमांक. कू.सार्थक कृष्णकांत सहाणे 200 मी. तृतीय क्रमांक. कू.तनुजा बाळासाहेब नरवडे 200 मी.मध्ये चतुर्थ क्रमांक,कू.वैष्णवी बाळासाहेब कदम 100 मी. मध्ये चतुर्थ क्रमांक तर मोठा गटात कू.सविता पारवे 400 मी. मध्ये चतुर्थ क्रमांक,कू. साक्षी कैलास वाकचौरे 200 मी. पाचवा क्रमांक कू.मुक्ता रेरे 100 मी. मध्ये चतुर्थ क्रमांक, कू.रूपाली जोरवर 100 मी.सहावा क्रमांक मिळवला.
तसेच जिल्हा विज्ञान मंडळा तर्फे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय इयत्ता नववीची विद्यार्थिनी कदम आकांक्षा राजेंद्र व इयत्ता सहावीचा विद्यार्थी पार्थ संदीप आंबरे यांचा प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा पातळीवर निवड झालेली आहे.
त्याचप्रमाणे संगमनेर तालुकास्तरीय स्पर्धेत श्रमिक कॉलेज संगमनेर येथे हिवरगाव आंबरे येथील कू.वेदांतिका विकास आंबरे (55 किलो) कुस्ती स्पर्धेमध्ये संगमनेर तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला.
सर्व विद्यार्थ्यांचे समस्त ग्रामस्थ हिवरगाव यांच्या वतीने सन्मान करून अभिनंदन केले त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक श्री.भागवत सर, गुंजाळ सर प्रशिक्षक म्हणून गोरे मॅडम व मदने सर व यशस्वी विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत हिवरगाव,विविध का.सेवा सह. सोसायटी व शालेय व्यवस्थापन समितीच्या यांच्या वतीने सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी हिवरगाव ग्रामपंचायत चे सरपंच शांताताई मेंगाळ, उपसरपंच भाऊसाहेब नाईकवाडी ग्रामपंचायत सदस्य संग्राम भाऊ आंबरे,अमोल अशोकराव ठुबे ,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा व ग्रामपंचायत सदस्य रूपालीताई कदम, कावेरी बोंबले, पुनमताई मोरे व वि.का.सोसायटीचे विद्यमान संचालक भाऊसाहेब कुरकुटे ग्रामस्थ माजी सरपंच सोमनाथ बोंबले, सुनिल आंबरे अभय दातीर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..