मोह,माया, इच्छा यामुळे मानव दुःखी – इंदोरीकर महाराज

वसंत टेकडीच्या साई मंदिरात गुरु पौर्णिमा उत्सवास प्रारंभ
महेश कांबळे
अहमदनगर-प्रत्येका मध्ये माया नावाची एक म्हातारी लपलेली असते पण ती दिसत नाही तिला १० मुले व ६ मुली आहेत ते कधी ना कधी जागृत होतात तर तिची मैत्रीण इच्छा पण येते त्यामुळे मानवाचे जीवन दुःखी बनले आहे हे सर्व जण भजनाला घाबरतात व शरीरातून निघून जातात, सुखी जीवन जगायचे असेल तर आपण आपल्या पुढील पिढीला भजने,हरिपाठ शिकवा असेे विचार हभप निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केले.
सावेडी उपनगरातील वसंत टेकडी जवळील संदेशनगर मधील द्वारकामाई साई मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा व मंदिराचा दहावा वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी आ. संग्राम जगताप, निखिल वारे,बाळासाहेब पवार,बबलू सूर्यवंशी, दत्ताभाऊ तापकिरे,माउली गायकवाड, नगरसेवक व मंदिराचे संस्थापक सुनील त्र्यबंके,अध्यक्ष योगेश पिंपळे आदीसह मोठ्या संख्येने भाविक दुपारी कार्यक्रम असूनही उपस्थित होते.
सध्याच्या जगात मूर्खांना किंमत आणि सज्जनांना त्रास सुरू आहे. खरे बोलला कि संपविला याचा प्रत्येय मला आला आहे प्रबोधन करतो महिलांना चुका सांगतो तर त्यांच्यावर टीका करतात असे म्हणतात ग्रंथराज ज्ञानेश्वरी आणि संतश्रेष्ठ तुकाराम महाराज गाथा यांची पारायणे भक्तिभावाने करा,त्यामधील विचार समजावून घ्या आणि त्याद्वारे आचरण करा तीच खरी भक्ती आहे.
सोने, नाणे ,पैसा-अडका यापेक्षाही भगवंताच्या नामाला अधिक महत्व असल्याचे आणि त्या भावनेतून भक्तीने आपल्या मनात देव साठवितो तोच खरा भक्त अशी आपली धारणा आहे.त्याच भावनेतून आज येथे मोठ्या प्रमाणावर किर्तनासाठी आपण सहभागी झालात हि समाधानाची बाब असल्याचे सांगून ते म्हणाले सुनील त्र्यंबके व श्री.साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठानने गुरुपोर्णिमेनिम्मित हा भव्य कार्यक्रम ३ दिवसीय कार्यक्रम ठेवला त्याचा आज शुभारंभ होत आहे जेथे भजन व भोजन असते.तिथे काही कमी पडत नाही,महाप्रसाद,अन्नदान केले त्यांनी पुण्याचे कार्य केले यातून त्याची दुप्पट प्रगती होईल.
इंदोरीकर यांच्या कीर्तनासाठी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता. इंदोरीकर यांनी समाजात चाललेल्या घटना, प्रत्येकाच्या घरातील समस्या,आई-वडिलांचे मुलांवरील लक्ष आदी विविध विषयांवर नागरिकांना प्रबोधन केले. नागरिकांनीदेखील या प्रबोधनपर कीर्तनाचा हसत हसत आनंद घेतला व कीर्तनातून चांगल्या प्रकारची शिकवण घेतली. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता

कार्यक्रम यशस्वितेसाठी साई-संघर्ष सामाजिक प्रतिष्ठान, संदेशनगरच्या पदाधिकारी व सदस्यांनी तसेच परिसरातील व शहरातील तरुण मंडळांनी परिश्रम घेतले.
– सावेडीतील वसंत टेकडी जवळील संदेशनगर मधील द्वारकामाई साई मंदिरामध्ये गुरुपौर्णिमा व मंदिराचा १० व्या वर्धापन दिनानिमित्त निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचे कीर्तन झाले. यावेळी आ.संग्राम जगताप,निखिल वारे,बाळासाहेब पवार, नगरसेवक सुनील त्र्यबंके,अध्यक्ष योगेश पिंपळेआदी मोठ्या प्रमाणात जनसमुदाय उपस्थित होता
