पिंपळगाव नाकविंदा ग्रामपंचायत उपसरपंचपदी दशरथ बगनर यांची निवड.

अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील डोंगराळ भाग म्हणून ओळखल्या गेलेल्या पिंपळगाव नाकविंदा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दशरथ लक्ष्मण बगनर यांची एकमताने निवड झाली
.गत पंचवार्षीक मध्ये लोकनियुक्त सरपंच तसेच उपसरपंच इतर सदस्य यांच्या निवडणूका पार पडल्या.या निवडणुकांमध्ये लोकनियुक्त सरपंच म्हणून सुमन सदु आढळ निवडून आल्या होत्या. तर इतर सदस्यांमध्ये बहुमताने सुनिता सुभाष बगनर यांची उपसरपंच म्हणून निवड झाली होती.
गेली काही वर्षे सुनिता बगनर यांनी उपसरपंचपदाची धुरा संभाळली.आपल्या गावासाठी विकासात्मक धोरणे राबविण्यासाठी होतकरू तरूणांनाही संधी मिळावी. कामाचा अनुभव यावा या संकल्पनेतुन पुढील काही कालावधीसाठी इतरांना संधी मिळावी म्हणून त्यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा ग्रामपंचायत कार्यालयास सादर केला. यानंतर पुढील कालावधीसाठी सदस्य म्हणून कार्यरत असणारे दशरथ लक्ष्मण बगनर यांची उपसरपंच म्हणून एकमताने निवड करण्यात आली. या निवडीबद्दल त्यांचा ग्रामपंचायत कार्यालयात यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी ग्रामपंचायतीच्या सरपंच सुमनताई आढळ,माजी सरपंच विजय गायकवाड, माजी उपसरपंच बबनराव आभाळे, माजी सदस्य वाळीबा लगड, पंढरीनाथ बगनर, ऋषीकेश लगड, कृष्णा मेंगाळ, कोतवाल सुनिल गायकवाड, लिपीक देवराम बगनर, कर्मचारी दिपक पथवे, योगेश पथवे आदी उपस्थित होते.
यावेळी उपसरपंच दशरथ बगनर यांनी गावात विज,रस्ते.पाणी, शिक्षण, आरोग्य या मुलभुत गरजा वेळच्यावेळी मिळण्याच्या दृष्टीने शक्य तेव्हढे प्रयत्न करनार असून या मुलभूत गरजा शेवटच्या व्यक्ती पर्यंत पोहचतील यादृष्टीने आहोरात्र प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त करून, गावातील अवैद्य धंदे पुर्णतः बंद करण्याचे आश्वासन दिले.