कोरठण खंडोबा देवस्थानला जिल्हाधिकार्यांची भेट!

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
खंडोबा देवस्थानाचे महात्म्य मोठे आहे. राज्यभरातील भाविक येथे विविध धार्मिक कार्यक्रमास येतात देवस्थान ट्रस्ट मार्फत विविध विकासकामे करण्यात आली आहेत. यापुढेही कामांना निधी उपलब्ध करून यापुढील काळात सर्वातोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी केले.
तर दुसरीकडे राज्याच्या ब वर्ग देवस्थान असणारा पिंपळगाव रोठा येथील खंडोबा देवस्थान परिसरात असणारी विविध विकास कामांसह भाविकांच्या सोयी सुविधांचा आढावा घेतला.
आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून या देवस्थानच्या परिसरातील इतर विकास कामांसाठी पाठपुरावा चालू केला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अशोक घुले यांनी सांगितले आहे.
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा येथील पिंपळगाव रोठा येथील राज्यस्तरीय ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्र दर्जा असणारे कोरठण खंडोबा देवस्थान क्षेत्रास जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी भेट दिली त्यावेळी माजी सरपंच अशोक घुले यांनी देवस्थान व गावाच्या
वतीने त्यांचा सन्मान केला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रांतधिकारी सुधाकर भोसले, शामशुद्दीन हवालदार सुनिल घुले, सोमनाथ घुले, सचिन आनंत, देवस्थान कर्मचारी सुखदेव गायकवाड, पप्पु पुंडे, विक्रम ढोमे, पुजारी दत्तात्रय क्षीरसागर, देविदास क्षीरसागर, वैभव क्षिरसागर उपस्थित होते.