पिंपळगाव कोंझिरा येथील मोलमजुरी करणारा वडार समाजाचा युवक झाला पीएसआय.

संजय साबळे/संगमनेर प्रतिनिधी-
आपल्या परिस्थिती चे रडगाणे न गात किशोर पवार याने पीएसआय परीक्षेत यश मिळविले
पिंपळगाव कोंझिरा (ता संगमनेर )येथील किशोर पवार याने परिस्थितीचा बाऊ न करता पी.एस.आय. पदावर पदाची परीक्षा दिली आणि त्यात तो यशस्वी ठरला
गरीबी मुळे अर्थवट शिक्षण सोडले नंतर मुक्त विद्यापीठाची पदवी घेऊन एम.पी.एस.सी.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पी.एस.आय होण्याचे स्वप्न् सत्यात उतरविले त्याने एक आदर्श आजच्या युवकापुढे निर्माण केला आहे.
किशोर पवार हा वडारी समजाचे असून यांचे दहावी पर्यंतचे शिक्षण गावात झाले. बारावी संगमनेर ला पूर्ण केले. परंतु घरी गरिबी पाचविला पुजलेली, आई वडील दररोज मोल मजुरी करून प्रपंच चालवित असे, त्यांना कामात मदत म्हणून किशोर पण मदत करीत असे.पण हुशार असणाऱ्या किशोर चे कामात काय लक्ष लागेना, शिक्षणाची ओढ त्याला गप्प बसू देत नव्हती.
अशातच पोलीस भरती सुरु झाली अन मग नशीब अजमवले अन ठाणे येथे भरती साठी गेला. पण आता पोलीस शिपाई ऐवजी साहेब झालं पाहिजे असे स्वप्न पहायला सुरवात झाली. त्यासाठी नोकरीचा राजीनामा दिला. अन यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ च्या बाह्य विभागातून पदवी साठी प्रवेश घेतला. अभ्यास सुरु झाला. पण परत पैश्याची चणचन भासायला लागली. मग परत पोलीस भरतीत गेला . मात्र साहेब होण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती ,त्यामुळे त्याने अजून नेटाने अभ्यास सुरु केला. २०१७ अन २०१८ च्या एम.पी.एस.सी. परीक्षेत पी.एस.आय. होण्याचे संधी थोडक्यात हुकली .पण २०२२ ला त्यांची जिद्द कामी आली. आणि तो राज्यात ७९ व्या क्रमांक ने पी. एस.आय झाला त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे
——-