एनडीएमव्हीपी फिजिओथेरपी कॉलेज मध्ये रोटरॅक्ट क्लबची स्थापना

नाशिक प्रतिनिधी
रोटरी क्लब ऑफ नाशिक अध्यक्ष ओमप्रकाश रावत यांच्या हस्ते एनडीएमव्हीपी फिजिओथेरपी कॉलेज मध्ये रोटरॅक्ट क्लबची कॉलेज सभागृहात नवीन रोटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली. क्लबच्या सचिव शिल्पा पारख, रोटरॅक्ट संचालक उर्मी दिनानी डॉ. गौरी कुलकर्णी ,वैशाली रावत यांनी क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांना पिन प्रदान केल्या.
३५ महाविद्यालयीन विद्यार्थी या क्लबमध्ये सामील झाले. अध्यक्षांनी त्यांच्या भाषणात त्यांना जगभरातील रोटरीच्या उपक्रमांची माहिती दिली आणि ग्रामीण भागात रोग प्रतिबंधक उपक्रम राबविण्याचे आव्हान केले.
कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अमरीत कौर , समन्वयक डॉ दिप्ती वाधवा, डॉ रितू पटेल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन रोट्रॅक्ट क्लब स्थापन करण्यात आला.
नव्याने स्थापन करण्यात आलेल्या *रोट्रॅक्ट यूथ हेल्थ अॅडव्होकेट क्लब* ची विद्यार्थी कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी सारा शेख,सचिव गौतम सूर्यवंशी,खजिनदार आर्या केळकर ,सेवा प्रकल्प संचालक समृद्धी आव्हाड, सभासद वृद्धी संचालक शुभम कनोजिया, जनसंपर्क संचालक ईश्वरी आहेर, रोटरी फाऊंडेशन चेअरमन पृथा सप्रे ह्यांची निवड करण्यात आली.