श्री बाळेश्वर विद्यालयात डाॕ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

लोकशाही व्यवस्थेचे संवर्धन व्हावे—- शिक्षणाधिकारी सुवर्णाताई फटांगरे
संगमनेर। प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे,श्री बाळेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सारोळे पठार या विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन संगमनेर पंचायत समिती शिक्षणाधिकारी श्रीमती सुवर्णाताई फटांगरे , प्राचार्य श्री रमेशचंद्र बेनके, पर्यवेक्षक सुनील साबळे ,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

यावेळी शिक्षणाधिकारी सुवर्णताई फटांगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. भक्ती भाव श्रद्धासुमणे तुला अर्पितांना कंठ दाटूनी ये आमचा पूरलोचनांना ! 6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय 1956 साली याच दिवशी दिल्ली येथे राहत्या घरी डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांचे निधन झाले. त्यामुळेच या दिवसाला महापरिनिर्वाण दिन असे म्हटले जाते. भारतात समता, सामाजिक न्याय आणि बंधुता प्रस्थापित व्हावी यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं कृतीयुक्त योगदान सर्वश्रुत आहे. बौद्ध धर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचे प्रमुख तत्त्व आणि ध्येय देखील आहे. बौद्ध धर्मातील लोक बाबासाहेबांना बोधिसत्व मानतात. विद्यार्थी दशेपासून जातीय भेदभाव सहन करीत त्यांनी त्यांनी पुढील शिक्षण राजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या शिष्यवृत्तीमुळे लंडन येथे शिकायला गेले. डॉ.आंबेडकरांनी जातीय भेद, अन्यायुद्ध लढा दिला. हिंदू कोड बिल, स्त्री शिक्षण ,स्त्रियांचे मूलभूत हक्क, अस्पृश्यता निवारण जातीभेद निवारण, उच्चनीचे भेदभाव, महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, संविधान असे महान कार्य केले. शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र त्यांनी दिला.
यावेळी श्री .गंगाधर पोखरकर,अशोक जाधव,चेतन सरोदे,सोमनाथ गोसावी,हेमंत बेनके,बाळासाहेब डगळे,संजय ठोकळ,विठ्ठल फटांगरे,रघुनाथ मेंगाळ,सोमनाथ सलालकर,भाऊराव धोंगडे,मोहन वैष्णव आदी उपस्थित होते.
सुत्रसंचलन तुकाराम कोरडे यांनी केले.