अहमदनगर

आमदार निलेश लंकेच्या समर्थनार्थ पाथर्डी कडकडीत बंद!

पाथर्डी: /प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 नगर ते पाथर्डी रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी आमदार निलेश लंके यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास पाठिंबा दर्शविण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने पाथर्डी शहरासह तालुक्यात कडकडीत बंद पुकारण्यात आला नागरिक व व्यापारी वर्गाने या बंद उस्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनाला पाठिंबा दिला.

आज सकाळी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अँड प्रतापराव ढाकणे यांच्या संपर्क कार्यालयापासून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, शिवसेना तालुकाप्रमुख भगवान दराडे,माजी नगरसेवक डॉ.दीपक देशमुख,शहराध्यक्ष योगेश रासने, वैभव दहिफळे,आक्रम आतार, आतिश निऱ्हाळी,बाळासाहेबांची शिवसेना चे तालुकाप्रमुख विष्णुपंत ढाकणे,वंचित बहुजन चे अरविंद सोनटक्के,चाँद मणियार,चंद्रकांत भापकर,मुन्ना खलिफा,साईनाथनगरचे युवानेते महेश दौंड,आनंद सानप,किशोर डांगे,सुनील दौंड,गणेश दिनकर, युसुफ खान,जुनेद पठाण,आकाश काळोखे,मोहम्मद खान,सचिन नागपुरे,संदीप राजळे,अनिकेत निनगुरकर,विनय बोरुडे यांनी शहरातून फेरी काढत व्यापाऱ्यांना आपली आस्थापने बंद ठेवण्याचे आवाहन केले.सर्व स्तरातील व्यापाऱ्यांनी यास उत्स्फूर्तपणे साथ देत दुकाने बंद ठेवली व आमदार लंके यांच्या आमरान उपोषणास पाठिंबा दर्शविला.

राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे,युवा नेते ऋषिकेश ढाकणे,माजी नगरसेवक बंडूपाटील बोरुडे हे लंके,माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ यांच्यासोबत नगर येथे आंदोलनात थेटपणे सहभागी आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button