नगर ,पारनेर, श्रीगोंदा तालुक्यातील चोरीच्या घटनेतील सराईत आरोपी गजाआड !

अहमदनगर प्रतिनिधी
, दिनांक १४/०३/२०२३ रोजी फिर्यादी श्रीमती शर्मिला कल्याण गायकवाड,वय ३४, रा. आरणगांवदुमाला, बेलवंडी, ता. श्रीगोंदा या त्यांचे कुटूंबियासह घरात झोपलेले असताना अनोळखी चार इसम येवुन घराचा दरवाजा कंशाने तरी उघडुन घरात प्रवेश करुन केबल व अज्ञात हत्याराचा धाक दाखवुन घरातील सामानाची उचकापाचक करुन सोन्याचे दागिने व रोख रक्कम बळजबरीने चोरी करुन घेवुन जात असताना फिर्यादीचे पती कल्याण गायकवाड यांनी आरोपींना विरोध करताच त्यांचे डोक्यात अज्ञात हत्याराने मारहाण करुन जिवे ठार मारुन १५,०००/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख चोरुन घेवून गेले होते. सदर घटने बाबत फिर्यादी यांनी बेलवंडी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादी वरुन बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ८३ / २०२३ भादविक ३९४, ३०२ प्रमाणे खुनासह
जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटनेचे गांभिर्य लक्षात घेवुन श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक, अहमदनगर यांनी घटना
ठिकाणास भेट देवून पोनि / श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची पथके नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले.नमुद आदेशान्वये पोनि / श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि / गणेश वारुळे, पोसई / सोपान गोरे,
पोहेकॉ/सुनिल चव्हाण, बबन मखरे, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, देवेंद्र शेलार, पोना / ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी, भिमराज खर्से, रवि सोनटक्के, पोकॉ/ विनोद मासाळकर, योगेश सातपुते, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ/ चंद्रकांत कुसळकर व चापोना / भरत बुधवंत यांचे पथक तयार करून कारवाई करणे कामी रवाना केले.
पथकातील अधिकारी व अंमलदार सदर गुन्हयाचा श्रीगोंदा व बेलवंडी परिसरात फिरुन आरोपीची माहिती घेवुन समांतर तपास करीत असताना पोनि / अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, सदर गुन्हा हा रांजणगांव मशिद, ता. पारनेर येथील आरोपी नामे निमकर काळे याने त्याचे इतर साथीदारांसह केला असुन ते जुना टोलनाका, तळेगांव दाभाडे, जिल्हा पुणे येथे पळुन गेले असुन आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशिर माहिती
मिळाल्याने पोनि / कटके यांनी सदर प्राप्त माहिती पथकास कळवुन, उविपोअ, कर्जत विभाग यांचे कार्यालयातील सफौ / अंकुश ढवळे व बेलवंडी पोलीस स्टेशनचे पोसई/चाटे, पोकॉ/ विनोद पवार व पंचाना सोबत घेवुन तात्काळ प्राप्त माहिती प्रमाणे तळेगांव दाभाडे, पुणे येथे जावुन खात्री करून कारवाई करणे बाबत आदेश दिले व तात्काळ रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तळेगांव दाभाडे येथे जावुन दोन दिवस मुक्काम तसेच वेशांतर करुन टोलनाका परिसरात आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती घेता बातमीतील वर्णना प्रमाणे संशयीत इसम व त्याचे इतर साथीदार टोलनाका परिसरात फिरतांना दिसले. पथक संशयीतांना शिताफीने ताब्यात घेण्याचे तयारीत असताना संशयीतांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागते पथकातील अधिकारी व अंमलद्वार यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना शिताफीने ताब्यात घेतले व तीन संशयीत इसम डोंगर व झाडाझुडपाचा फायदा घेवुन पळुन गेले त्यांचा शोध घेतला
परंतु ते मिळुन आले नाही. ताब्यात घेतलेल्या संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांना त्यांचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) निमकर अर्जुन काळे, वय २१, रा. रांजणगांव मशिद, ता. पारनेर, २) शेखर उदास भोसले, वय २०, रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा, ३) अतुल उदास भोसले, वय १९, रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा व एक विधीसंघर्षीत बालक असे असल्याचे सांगितले. ताब्यातील चार संशयीताकडे वर नमुद गुन्ह्याबाबत विचारपुस करता
विचारपुस करता सुरुवातीस ते समाधानकारक उत्तरे न देता उडवाउडवीची उत्तरे देवु लागले त्यांना अधिक विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने चौकशी केली असता त्यांनी त्यांचे साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली दिल्याने चारही आरोपींना ताब्यात घेतले.
ताब्यातील आरोपींना विश्वासात घेवुन अहमदनगर जिल्ह्यात आणखी किती ठिकाणी व कोठे कोटे गुन्हे केली आहे या बाबत विचारपुस केली असता आरोपींनी आम्ही रायगव्हाण, ता. श्रीगोंदा व पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली व राळेगणथेरपाळ येथे घरात प्रवेश करुन मारहाण करुन चोरी केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे जबरी चोरीचे गुन्हे दाखल असले बाबत
बेलवंडी ,सुपा ,पारनेर पोलीस स्टेशन ला जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत
चारही आरोपींना बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी नामे निमकर काळे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी, चोरी व घरफोडी असे गंभीर स्वरुपाचे एकुण १२ गुन्हे दाखल आहेत ते
आरोपी नामे अतुल भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात जबरी चोरी, चोरी व गंभीरदुखापत करणे असे गंभीर स्वरुपाचे एकुण ०५ गुन्हे दाखल आहेत
आरोपी नामे शेखर भोसले हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर जिल्ह्यात दरोडा तयारी असा गंभीर स्वरुपाचे एक गुन्हा दाखल आहे
आरोपीचे तीन फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहे
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपुर
पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. आण्णासाहेब जाधव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.