इतर

कोतूळ येथील केंद्रीय आश्रम शाळेत शालेय साहित्याचे वाटप

गौतम शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने केले वाटप

अकोले प्रतिनिधी

  कोतुळेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कोतुळ (ता. अकोले) येथील केंद्रीय निवासी अनु जमाती प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत मुलांना शालेय साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले 

 ब्राह्मणवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते गौतम शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना या शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले

 यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते व संस्थेचे अध्यक्ष  विजयराव वाकचौरे, वाशेरे गावचे सरपंच रमेश शिरकांडे, कळस गावचे सरपंच व आरपीआयचे तालुका अध्यक्ष  सरपंच राजेंद्र गवांदे, युवक कार्यकर्ते गौतम रोकडे, पत्रकार सुनील गीते, कोतुळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक बी. एन. गीते, ब्राह्मणवाडा येथील सर्वोदय  आश्रमशाळेचे मुख्याध्यापक प्रकाश लांडगे, श्री देठे सर, श्री शिंदे दादा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते 

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले नंतर विजयराव वाकचौरे, राजेंद्र गवांदे,रमेश शिरकांडे,गौतम रोकडे,सुनील गीते यांनी मार्गदर्शन केले गौतम शिंदे यांनी वाढदिवसानिमित्ताने आपल्या भावना व्यक्त केल्या  व पुढील शैक्षणिक वर्षातही मुलांना शालेय साहित्य देण्याचे आश्वासन दिले 

तर संस्थेचे अध्यक्ष  विजयराव वाकचौरे यांनी सांगितले की संस्था अतिशय अडचणीतून उभी राहिली  संस्थेने अल्पावधीतच भव्य  इमारत उभी केली आदिवासी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण व चांगल्या सोयी सुविधा   शाळेत पुरविल्या जातात  वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करणे हा एक चांगला आदर्श निर्माण केला याचे त्यांनी  कौतुक केले

 केंद्रीय आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री सुधाकर लांडगे  यांनी  स्वागत व सूत्रसंचालन  केले यावेळी शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते 

———

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button