सोनई पोलीस स्टेशन चे पोलीस हेडकॉन्स्टेबल
अनंथा गायकवाड यांचे अपघाती निधन.!

नेवासा प्रतिनिधी
सोनई पोलीस स्टेशन येथे सेवेत असणारे पोलीस कर्मचारी अनंथा बंडू गायकवाड यांचे अपघाती निधन.झाले !
वॉरंट बजावणी कामी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंथा
गायकवाड (५४) हे वांजोळे या ठिकाणी जात होते नगर-औरंगाबाद महामार्गावर पांढरी पुल येथे त्यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला.त्यांच्या मूळ गावी पारनेर तालुक्यातील धोत्रे या ठिकाणी शासकीय इंतेमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
आपल्या सहकाऱ्यांशी त्याचप्रमाणे परिसरातील सर्वांच्या अडचणी समजून घेणारे गायकवाड दादा यांच्या अपघाती निधनाने सोनई परिसरात शोककळा पसरली आहे.
सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी, पोलीस निरीक्षक राजेंद्र थोरात व सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने व पत्रकार बांधवांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीअर्पण केली