इतर
काशिनाथ मालुंजकर यांचे निधन

अकोले (प्रतिनिधी)-तालुक्यातील रुंभोडी( मालुंजकर वाडी) येथील धार्मिक वृत्तीचे काशिनाथ गेणू मालुंजकर ( वय 90 ) यांचे आज मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ व चार मुले ,एक मुलगी, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.अकोले येथील राजपुष्प फ्लेक्सचे संचालक राजेंद्र मालुंजकर, शिक्षक केशव मालुंजकर,खासगी कंपनी मध्ये सेवेत असणारे अरविंद मालुंजकर, लँड डेव्हलपर्स व शेतकरी बाळासाहेब मालुंजकर, सौ.उषा पंढरीनाथ आरोटे यांचे ते वडील होत.
त्यांच्या वर रुंभोडी येथे प्रवरा तिथी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



