अहमदनगर

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आश्वासनानंतर आमदार लंकेचे उपोषण सुटले !

अजित दादांची यशस्वी मध्यस्थी

उपोषण सुटल्या नंतर

लंकेनी घेतले मोहोटा देवीचे दर्शन !

दत्ता ठुबे

अहमदनगर दि१०

राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मध्यस्थीनंतर व केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरींच्या आश्वासना नंतर आ. निलेश लंके यांचे उपोषण सुटले


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी जिल्ह्यातील तीन महामार्गांच्या दुरूस्तीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या चौथ्या दिवशी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मध्यस्थी करत थेट केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी फोन वरून चर्चा करून यावर तोडगा काढला. आ. लंके यांच्याशी गडकरी यांनी फोनवर चर्चा करत हे काम तातडीने सुरू करण्याच्या आश्वासन देतानाच या कारणासाठी पुढील काळात उपोषण करण्याची वेळ कोणावर येणार नाही, अशी ग्वाही दिल्यानंतर चौथ्या दिवशी आ.निलेश लंके यांनी उपोषण मागे घेतले. 

मंत्री गडकरी यांनी महामार्ग दुरूस्तीचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण केले जाईल. यात मी जातीने लक्ष घालत हा प्रश्न आमदार लंके यांच्या माध्यमातून निकाली काढण्यात येणार आहे. नवीन ठेकेदाराची नियुक्ती करुन जानेवारी व फेब्रुवारी अखेर हे काम पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. केंद्रीय रस्ते व भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी यापुढील काळात उपोषण करण्याची वेळ भविष्यात येणार नाही असे आमदार निलेश लंके यांच्या सह विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिले आहे.
   यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, घनश्याम शेलार, शिवशंकर राजळे, क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे सतीश पालवे, हरिहर गर्जे, हरिदास जाधव, राजाभाऊ दौंड, बंडू पाटील बोरुडे, नंदकुमार मुंडे, विष्णुपंत ढाकणे, सोमनाथ मोहिते, बाळासाहेब हराळ, अशोकराव सावंत, सौ राणीताई लंके, ज्ञानदेव लंके,  दिपक लंके, रफिक शेख, नगराध्यक्ष विजय औटी, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, कारभारी पोटघन, अ‍ॅड गर्जे, किसन आव्हाड, हरिदास जाधव, डॉ बाळासाहेब कावरे, अभय नांगरे, चंद्रकांत ठुबे, सचिन पठारे, सचिन गवारे, शकुंतला लंके, वंदना गंधाक्ते, वैजयंता मते, राजश्री कोठावळे, सतीश भालेकर, यांंच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 
   पारनेर-नगर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी ७ डिसेंबर पासून महामार्ग दुरुस्तीसाठी उपोषणास बसलेले आहेत. अहमदनगर शहराला जोडणारे रस्ते अ.नगर, पाथर्डी, शेवगाव नांदेड निर्मल रस्ता. राज्य क्र.६१, अहमदनगर-राहुरी- कोल्हार- शिर्डी कोपरगाव रस्ता रा.म. क्र.१६०व अ. नगर मिरजगाव-चापडगाव-करमाळा- टेंभुर्णी रस्ता रा. भ. कु ५६१/  या तीनही रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. हे तीनही महामार्ग अहमदनगर शहराला जोडणारे प्रमुख महामार्ग आहेत. या तीनही महामार्ग रस्त्यांची दुरावस्था झाल्यामुळे अनेक अपघात होऊन अनेक लोकांचे बळी गेलेले आहेत. तेव्हा या रस्त्यांबाबत दुरुस्तीसाठी आमदार निलेश लंके  यांनी गेल्या ३ दिवसांपासून हे आंदोलन चालू केले आहे.
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार  शनिवारी दुपारी १२ वाजता आमदार निलेश लंके यांच्या उपोषणाला भेट देऊन चर्चा केली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या सह राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी  व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अधिका-यांनी शब्द दिल्याने व सर्व सामान्य लोकांचे जीव जावु नयेत हे काम तातडीने चालु करावे यासाठी आमदार निलेश लंके यांचे उपोषण सोडले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी अजित पवार म्हणाले की आमदार निलेश लंके यांनी या रस्त्यावर केवळ मार्ग काढुन उपयोग नाही काम चालू झाले पाहिजे.या रस्त्याची अवस्था फार वाईट आहे.या सगळ्या संदर्भात जे ठेकेदार जीडीसीएल कंपनीने काम न करता कासार ठेकेदाराला काम दिले.यानंतर अनेक ठेकेदारांना दिले आहे. काम करत असताना ठेकेदार बदलल्याने हे काम पूर्ण झाले नाही.यावेळी आमदार निलेश लंके म्हणाले जिल्ह्यातील प्रमुख तीन रस्त्यांसाठी हे उपोषण सोडविण्यासाठी आले.आपल्या मागण्या व लढा  यशस्वी झाला असून यापुढेही याचा पाठपुरावा चालू ठेऊ आश्वासन आमदार निलेश लंके यांनी दिले आहे. उपोषण सुटल्यानंतर आमदार लंके यांनी मोहटादेवी चे दर्शन घेतले उपोषणास पाथर्डी करांनी मोठा प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांनी पाथर्डीकर यांचे आभार मानले व पाथर्डीच्या रस्त्याच्या सुरू केलेल्या कामाची त्यांनी तात्काळ पाहणी केली

उपोषणास पाठिंबा देणार्‍या आंदोलन कर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून ते गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे केली. याप्रश्नी मुख्यमंत्र्यांशी बोलतो असे अजित दादा पवार यांनीसांगितले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button