आरोग्य सुविधा व कल्याणकारी योजनां साठी बिडी कामगारांची निदर्शने

पुणे प्रतिनिधी
भारत सरकारच्या कामगार मंत्रालयाने देशभरातील बिडी दवाखाने, 11 हाॅस्पीटल ई स आय चे कडे हस्तांतरीत करणे बाबतीत भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा च्या वतीने दि 6 जानेवारी रोजी सोनवणे हाॅस्पीटल समोर तीव्र निदर्शने केली.
यावेळी मार्गदर्शन करताना बिडी महासंघाचे कार्याध्यक्ष उमेश विस्वाद यांनी बिडी कामगारांच्या आरोग्य व कल्याणकारी सुविधा करिता बिडी वेलफयर सेस मध्ये कायदेशीर बदल केल्या शिवाय हस्तांतरीत करू नये. बिडी कामगारांच्या ई स आय चे अंशदान सरकारने भरावे, अन्यथा भामसंघ देशभरातील विविध राज्यात आंदोलन, करणार आहे असा इशारा मार्गदर्शन करताना ऊमेश विस्वाद यांनी दिला आहे.
सध्या बिडी वेलफयर बोर्ड कडे देशभरातील 80 लाख, महाराष्ट्र राज्यात 2.56 लाख लाभार्थी आहेत. या योजनेचा चा भाग म्हणून निःशुल्क आरोग्य, शिक्षण, घरकुलं, बाळंतपण, चष्मा, खेळ स्पधा, मृत्यू पश्चात लाभ इ योजना राबविण्यात येत होत्या. अशा सुविधा ई ऐस आय ने दिल्या तर बिडी कामगारांना लाभ होवु शकतो. पण या बाबतीत ई स आय कडून प्रतिसाद दिला नाही.
अंशदान भरण्यात भारत सरकारने सन 2016 साली केला होता पण अद्याप पर्यंत बजेट मध्ये तरतूदी केल्या नाहीत. त्यामुळे बिडी कामगारांच्या लाभ मिळणार नाही, त्यामुळे मुळे सदरील योजना फसवी आहे असे संघटनेचे मत आहे .
बिडी ऊद्योगात सध्या सुमारे 90:% जास्त कंत्राटी कामगार कार्यरत आहेत त्यामुळे ओळखपत्रे अभावी कल्याणकारी योजना मिळत नाही या बाबतीत सरकार पुर्ण पणे दुर्लक्ष करत आहे.
या निदर्शने मध्ये ऊमेश विस्वाद, नीलेश गादगे, वासंती तुम्मा, सुरेखा गुंदेटी, देवकी चिकला, यांनी या वेळी संघटनेने निवेदन डाॅ विजय ऊबाळे वैद्यकीय अधिकारी यांना देवुन केंद्र सरकारच्या कामगार विभाग कडे पाठविले आहे. तसेच निवेदन मा हिम्मत खराडे निवासी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
या वेळी उमेश विस्वाद, नीलेश गादगे, वासंती तुम्मा, सुरेखा गुंदेटी, चंद्रकला जाना , देवकी चिकला, अनिता परदेशी यांनी नेतृत्व केले.
