इतर
राजापूर महाविद्यालयात सायबर सिक्युरिटी सेमिनार सम्पन्न……

संगमनेर प्रतिनिधी
प्रागतिक शिक्षण संस्थेचे नूतन कला महाविद्यालय राजापूर येथे एक दिवसीय सेमिनार सम्पन्न झाले
.याप्रसंगी श्री स्वामी समर्थ कॉम्प्युटर च्या ओनर श्रीमती ज्योती हासे यांनी सायबर सिक्युरिटी व जनरल अवेअरनेस या विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले. तंत्रज्ञानाच्या युगात सायबर गुन्हे कसे घडतात व त्यावर कशी उपाययोजना करावी याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले ,त्यामध्ये प्रामुख्याने सायबर गुन्हे कसे थांबवले जाऊ शकतात याविषयी सरांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य सुभाष वर्पे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन चव्हाण मॅडम यांनी केले.