इतर

कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात -अॅड.मनोहरराव देशमुख.

सत्यनिकेतन संस्थेत गुणवंत क्रिडापटूंचा सत्कार समारंभ संपन्न.

अकोले/प्रतिनिधी –

वेळ आणि खेळ कधी बदलेल सांगता येत नाही त्यामुळे कायम तयारीत रहा.जिवनाच्या शर्यतीत कधीच दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका.पळायचेच असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा.त्यासाठी कष्ट घ्या,कारण कष्टाने पुर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवतात.असे प्रतिपादन सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख यांनी केले. अकोले तालुक्यातील राजुर येथील सत्यनिकेतन संस्थेत संस्थेच्या विदयालयातील गुणवंत क्रिडापटूंचा सत्कार समारंभ संपन्न झाला.याप्रसंगी अॅड.मनोहरराव देशमुख विचारमंच्यावरून बोलत होते.

सत्यनिकेतन संस्थेच्या अॅड.एम.एन.देशमुख महाविदयालयातील सहा खेळाडूंची राष्ट्रीय व विभागीय स्तरावर कुस्तीसाठी निवड झाली.सर्वोदय विदया मंदिर खिरविरे येथील तेरा खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली. गुरूवर्य रा.वी.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर राजुर येथील सव्विस खेळाडूंची व दोन कब्बड्डी संघ, पाच हॉलीबॉल संघांची जिल्हास्तरावर निवड झाली.डॉ.राजेंद्र प्रसाद अनुदानीत आश्रमशाळा शेणित येथील खेळाडूंची जिल्हास्तरावर निवड झाली. या गुणवंत क्रिडापटूंचा सत्कार समारंभाचे आयोजन सत्यनिकेतन संस्थेने केले होते.

याप्रसंगी व्यासपिठावर संस्थेचे सचिव टि.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन,संचालक मिलिंदशेठ उमराणी,मारूती मुठे,विभागिय अधिकारी प्रकाश महाले,श्रीराम पन्हाळे,रामजी काठे,चिमणजी देशमुख,नंदकिशोर बेल्हेकर,माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर,विजय पवार,मुळे मॅडम,प्राचार्य डॉ.बि.वाय.देशमुख,मनोहर लेंडे,लहानु पर्बत,उपप्राचार्य बादशहा ताजणे,भाऊसाहेब बनकर,संपत धुमाळ यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विदयार्थी उपस्थित होते.

अॅड.मनोहरराव देशमुख यांनी पुढे मार्गदर्शन करताना क्रिडा क्षेत्रातील आजचा सत्कार समारंभ सर्वात आनंदाचा क्षण आहे.पुस्तकी ज्ञाना बरोबरच शक्ती,युक्ती व बुद्धी यावरच खेळात यश मिळवता येते.आपल्या आयुष्यात खेळाला महत्वाचे स्थान असून खेळामुळे चांगल्या गुणांची वाढ होते. बुद्धीला चालना मिळते. नेतृत्व कौशल्य वाढते.व्यक्तिमत्व विकास होतो.हा विकास चिरंतर टिकवून ठेवा, आई-वडील,विदयालय,संस्थेचे नाव रोशन करा असेही मत व्यक्त केले.

कोषाध्यक्ष विवेकजी मदन यांनी आजच्या धकाधकीच्या युगात खेळाचे महत्त्व अमूल्य आहे.खेळामुळे जिद्द,चिकाटी,सहकार्यवृत्ती,समुहभाना आदी गुणांचा विकास होतो. त्यामुळे जास्तीत जास्त मुले खेळासाठी जास्त वेळ देतील याकडे लक्ष दया.कारण आजचे मुले उदयाची भावी नागरीक असल्याने खेळाचे महत्त्व खुपआहे. असे विचार व्यक्त करून सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.

सचिव टि.एन.कानवडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पराभव पचविल्याशिवाय यश प्राप्त होत नाही.खेळ हा व्यायामाचा चांगला प्रकार आहे.त्यातुनच खिलाडूवृत्ती अंगी येते.खेळ खेळताना आपले शरीर,बुद्धी,मन एकाग्र होते त्यामुळे ज्या क्षेत्रात आवड असेल तेच क्षेत्र निवडा यश निश्चित मिळेल असे मत व्यक्त करून उपस्थितांचे स्वागत केले.

सत्कार समारंभाचे वाचन क्रिडाशिक्षक भाऊसाहेब बनकर व सचिन लगड यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संतराम बारवकर यांनी केले. तर संचालक मिलिंदशेठ उमराणी यांनी उपस्थितांचे आभार मानले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button