राजूर च्या सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
अभिनव शिक्षण संस्था संचलित सह्याद्री व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूल राजुर मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिवसाचे औचित्य साधून माता पालकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध मनोरंजन खेळ, तसेच क्रिकेट स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षिस देऊन सन्मानित करण्यात आले.
क्रांतीज्योती सावत्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस नंदकिशोर क्षीरसागर यांनी आदर्श माता व महिला यांच्या बद्दल आदर व्यक्त करत राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग सांगत सर्वांनी आदर्श घ्यावा असे मत व्यक्त केले. तसेच स्पृहा गोडे, आदिती वाकचौरे, आराध्या जाधव, कस्तुरी साबळे, ईश्वरी हळकुंडे यांनी नृत्य सादर केले तर श्रेया उघडे, जिविका पाटील, मिहिका गभाले यांनी गीतगायन केले तर अरूषमली सोनवणे व शौर्या वाकचौरे यांनी प्रज्ञा योगा चे प्रात्यक्षिके सादर केली.तसेच शाळेच्या शिक्षिका संगीता बारेकर यांनी व माता पालक नीलम दहितुले यांनी ही गाणी सादर केली त्यास संगीत शिक्षक आशिष हंगेकर यांची साथ लाभली. माता पालकांसाठी आयोजित केलेली क्रिकेट स्पर्धा या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
शाळेच्या प्राचार्या स्मिता पराड यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना तसेच माता पालकांना मार्गदर्शन केले. यात त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले संस्कार रुजविण्यात माता ही महत्त्वाची असते त्यातूनच चांगली पिढी घडते त्याच बरोबर मुलींना स्वावलंबी व धाडसी बनवा. असे प्रतिपादन यावेळी केले. यावेळी विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमास दीप्ती लहामगे, मनीषा सोनवणे, मुक्ता वाकचौरे, श्रद्धा पाटील, कल्पना सुकटे,अर्चना साबळे, वंदना आरोटे, कहाणे योगिता, मयूर वाकचौरे, दिनेश पथवे, नितीन देशमुख, गणेश धिंदळे, किरण भांगरे, प्रमिला राऊत, नंदा बांडे, कादिर शेख आदी शिक्षक व कर्मचारी वृंदांचे मोलाचे सहकार्य लाभले.