बोगस बांधकाम कामगार नोंदनी करणा-या अभियंत्याचा परवाना रद्द करुन चौकशी करा- अविनाश पवार

पारनेर प्रतिनिधी:-
बांधकाम कामगार खरे लाभार्थी योजनेपासुन वंचित ठेऊन बांधकाम कामाशी कसलाही संबंध नसताना सुद्धा पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदणी करून ९००ते १३००रुपये रक्कम घेऊन बांधकाम अभियंता यांनी संगनमत करुन खरा लाभार्थी योजनेपासुन वंचित ठेऊन बांधकाम कामगार नसताना सुद्धा बोगस प्रमाणपत्र तसेच ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी बोगस दाखला देऊन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी बांधकाम अभियंता तसेच ग्रामसेवक यांनी संगनमत करुन बांधकाम कामगारांच्या बोगस नोंदी करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी त्वरित चौकशी करुन संबंधित ग्रामसेवक यांची निलंबनाची कारवाई करुन कामगार नसताना सुद्धा बांधकाम कामगारांची बोगस नोंदणी करणारे बांधकाम अभियंता यांनी कामगार नोंदणी करण्यासाठी९००ते १३००रुपये वसुली केली असल्याची धक्कादायक माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे प्राप्त झाली आहे. संबंधित प्रकरणांची चौकशी केली असता बोगस नोंदणी करणारे एजंट सुद्धा पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे शासनाची दिशाभूल करीत बोगस प्रमाणपत्र देऊन शासनाची फसवणुक केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पारनेर तहसीलदार यांना निवेदन देऊन सखोल चौकशी करून दोषी बांधकाम अभियंत्याचा परवाना कायम स्वरुपी रद्द करावा व बोगस लाभार्थींना संबंधित योजनेचा दिलेला लाभ वसुल करुन त्यांच्यावर आठ दिवसांत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी अशी मागणी केली आहे,जर आठ दिवसांत कारवाई झाली नाहीतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तहसीलदार यांच्या कार्यालयात उपोषण करण्यात येणार असल्याचे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पवार यांनी सांगितले.यावेळी सहकार सेना जिल्हाध्यक्ष नितीन म्हस्के ,जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले तसेच पारनेर तालुका उपाध्यक्ष सतीश म्हस्के सह मनसैनिक उपस्थित होते.