इतर

अकोले तालुक्यात मासळी बाजाराची धूम ! सुक्या, मासळीचे भाव गडगडले खरेदी साठी ग्राहकांची झुंबड !

अकोले प्रतिनिधी –

अकोले तालुक्यात सुक्या मासळी बाजाराची धूम सुरू आहे सुक्या, मासळी बाजारचे भाव गडगडल्याने सुकी मासळी खरेदी साठी ग्राहकांची झुंबड उडाली !

बोंबील, सुकट, मांदिली,वाम या सारख्या सुक्या मासळी ला अलीकडे चांगली मागणी वाढली आहे कोराना काळापासून तर मासळी बाजार चांगला भरला आज मटण चिकन चे बाजार भाव मोठया प्रमाणात वाढले आहे कोंबडीचे मटण चे भाव 150 ते 350 पर्यंत पोहचले आहे तर बोकडाचा मटण 500 ते 600 रुपये किलो पर्यंत पोहचले आहे कटला रोहू मिरगला कोंबडा सुरमई चिलापी , या सारख्या माशांचा बाजारही 200ते 350 रुपये किलो पर्यंत पो हचला आहे कोरोना काळा पासून तर मटण चिकन मासे या ला आहारात चांगलेच महत्व आले आहे बोंबील सुकट वाम मांदिली या सुक्या मासळीची ही मागणी वाढली आहे आदिवासी भागात या सुक्या मासळीचा आहार लोकप्रिय आहे हे पाहून स्थानिक मासळी विक्रेत्यांनी मासळी चे भाव वाढवून 500ते 600 रुपये किलो पर्यंत नेले यामुळे खवय्ये हिरमुसले मात्र गेल्या काही दिवसां पासून अकोले तालुक्यातील सुकी मासळी खवय्ये मध्ये आनंद दिसून येत आहे मासळी खरेदी साठी सर्वसामान्यांना ग्राहकांची झुंबड उडाली आहे मासळी बाजारचे भाव अचानक गडगडल्याने अकोले आणि कोतुळ येथील आठवडे बाजारामध्ये खरेदीदारांची एकच झुंबड उडाली मासळी विक्रीतून काही तासात लाखो रुपयाची उलाढाल झाल्याचे दिसून आले

मागील काही दिवसापासून वसई, विरार पालघर या भागातून काही सुकी मासळी विक्रेते अकोले तालुक्यातील आठवडे बाजारामध्ये येऊ लागले आहे बोंबील ,वाम, मांदिली,सुकट झिंगा अशा वेगवेगळ्या प्रकारचे सुकी मासळी आणून हे विक्रते आठवडे बाजारात विकत आहे एरवी आठवडे बाजारात 500 ते 600 रुपये किलो दराने मिळणारी ही मासळी ग्राहकांना अवघ्या 200 ते 250 रुपये किलो या भावात मिळू लागल्याने मासळी खाणाऱ्यांची या दुकानावर खरेदी साठी झुंबड उडाली .५० रुपये वाटा या प्रमाणे सरसकट विक्री सुरू केल्याने या विक्रेत्यांची लाखो रुपयांची उलाढाल होत आहे
200ते 250 या भावाने विक्री करण्यास व बाहेरील विक्रेत्यांना आठवडे बाजारात बोंबील सुकट वाम मंदिली ही सुकी मासळी विक्री करण्यास स्थानिक विक्रेत्यांनी विरोध केला व हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला परंतु प्रशासन आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी मध्यस्थी करत हा तणाव कमी केला आणि या नव्याने आलेल्या मासळी विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली

सुकट,, बोंबील अशा प्रकारच्या सुक्या मासळीचे 50 रुपये वाटा याप्रमाणे खुली विक्री सुरू केल्याने मासळी खवये यांची मात्र चंगळ झाली

एरवी 500 ते 600 रुपये किलो भावाने मासळी खरेदी करणाऱ्यांनी आनंदाने दुपटीने खरेदी करून आनंद घेतला बुधवारी( दिनांक 28 )रोजी कोतूळ येथील आठवडे बाजारात देखील या व्यापाऱ्यांनी ही सुकी मासळी विक्रीची दुकाने थाटली यावेळी या विक्रेत्यांनी गाडी भरून आणलेली सुकी मासळी हातोहात काही तासात संपली आज गुरुवारी (दि 29 रोजी )दुसऱ्या दिवशी आठवडे बाजारात ही मासळी विक्रीची दुकाने थाटली होती
आठवडे बाजारातील स्थानिक मासळी विक्रेते दुकानदारांनी यावरती आक्षेप घेतला

आठवडे बाजारातील स्थानिक व्यापारी जादा नफा घेत पाचशे ते सहाशे रुपये किलो दराने मासळी विक्री करत होते तर नव्याने आलेले हे मासळी विक्रते 200 ते 250 रूपये भावा ने मासळी विकत होते यात मोठी तफावत दिसत असल्याने मासळी खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी स्थानिक व्यापाऱ्यांचे दुकानाकडे पाठ फिरवली

स्थानिक व्यापाऱ्यांची वैभव पिचड यांचेकडे धाव!

स्थानिक व्यापाऱ्यांच्या दुकानदाराकडे ग्राहकांनी पाठ फिरवली तर नव्याने आलेल्या या मासळी विक्री दुकानाकडे ग्राहकांनाची लाईन लागली नव्याने आठवड्या बाजारात आलेल्या या मासळी विक्रेत्यांनी बोंबील सुकट मांदिली अशा सुक्या मासळी खवय्यांची चंगळ करून टाकली अवघ्या पन्नास रुपयात मासळी मिळत असल्याने अनेकांच्या कानोकानी ही बातमी पोचल्याने आठवडे बाजारात मासळी खरेदी साठी ग्राहकांचे लोंढे या दुकाना कडे सुरू होते यामुळे या ठिकाणी आलेल्या नवीन व्यापाऱ्यांची मासळी काही तासात संपली


तालुक्यातील आठवडे बाजारांमध्ये पालघर जिल्ह्यातून वसई ,विरार ,या भागातील व्यापारी मासळी विक्रीस येऊ लागल्याने ग्राहकांना मात्र चांगलीच पर्वणी सापडली साधली आहे ताज्या आणि फ्रेश मालाला ग्राहकांडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचें या महिला व्यापाऱ्यांनी सांगितले

सुरुवातीच्या काळात या आठवड्या बाजारामध्ये या विक्रेत्यांना उसकावून लावण्याचा प्रकार झाला ग्राहकांचा रोष रोज वाढू लागल्याने शासनाने ची दखल घेऊन या व्यापाऱ्यांना आठवडे बाजारात जागा उपलब्ध करून दिली स्थानिक नगरपंचायत/ ग्रामपंचायत प्रशासनाची बाजार कर पावती फाडून या व्यापाऱ्यांनी दुकाने मांडल्याने स्थानिक व्यापाऱ्यांना काही करता आले नाही स्थानिक व्यापाऱ्यांचा विरोध मावळला

स्थनिक मासळी विक्रेत्यांनी या विरुद्ध एकत्र येत या नव्या मासळी विक्रेत्यांना थोपवण्याचे प्रयत्न केले माजी आमदार वैभव पिचड यांच्याकडे त्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले त्यांनीही स्थनिक प्रशासनाला सूचना दिल्या

ग्राहकांना बाहेरील व्यापाऱ्यांकडून स्वस्त माल मिळत असला तरी स्थानिक व्यापारी बेरोजगार होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे असे माजी आमदार वैभवराव पिचड यांनी याबाबत बोलतांना सांगीतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button