अहमदनगर

पाथर्डी तालुक्यात ११ ग्रामपंचायत साठी उद्या मतदान , प्रशासन सज्ज

पाथर्डी प्रतिनिधी

पाथर्डी तालुक्यात उद्या रविवार दिनांक 18 डिसेंम्बर रोजी 11 ग्रामपंचायत च्या निवडणुकांसाठी मतदान होत आहेत यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली आहे


पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, कोरडगाव, भालगाव या प्रमुख गावांच्या ग्रामपंचायतीसह ११ गावच्या ग्रामपंचायत निवडणुकांचा जाहीर प्रचार आज थंडावला तुल्यबळ लढतीमुळे या गावातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.तिसगाव, कोरडगाव, भालगाव, वैजुबाभळगाव, मोहरी, वडगाव, सोनोशी, कोळसांगवी, निवड़गे, कोल्हार, जिरेवाडी येथे रविवारी ग्रामपंचायत व सरपंच पदासाठी मतदान होत आहे.
प्रशासनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. मतदानावेळी व निकालानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ही तैनात
करण्यात येणार आहे. राजकीयदृष्टया व मोठी लोकसंख्या असणाऱ्या
तिसगाव, कोरडगाव व भालगाव या ठिकाणच्या निवडणुकांकडे तालुक्यातील नागरिकासह
राजकीय नेत्यांचेही लक्ष लागले आहे. सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड निवडणूक चुरशीची होणार आहे. सरपंचपदाच्या ११ जागांसाठी ३३
उमेदवार नशीब अजमावत आहेत. तर सदस्य पदासाठी जवळपास १०० जागांसाठी २४० उमेदवार रिंगणात आहेत. काही ठिकाणी
दुरंगी, तिरंगी लढती होत आहेत तर एक दोन ठिकाणी सरपंच पदासाठी चार उमेदवार आपले
नशीब आजमावत आहेत. तिसगाव मध्ये ज्येष्ठ नेते
काशिनाथ पाटील लवांडे आपला गड राखतील की विरोधक बाजी मारतील. कोरडगाव मध्ये वंचित

चे भोरू म्हस्के गड जिंकतील की त्यांचे विरोधक गड सर करतील.भालगावच्या होमपीचवर भाजपचे
तालुकाध्यक्ष माणिकराव खेडकर आपला करिष्मा दाखवतील की ज्येष्ठ नेते कासुळे पाटील
करिष्मा करतील. सोनोशीच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते गोकुळ दौंड यांचे बिनविरोध निवडणुकीचे
प्रयत्न थोडे कमी पडल्याने येथील निवडणूकीत ही चुरस निर्माण झाली आहे. तेथे ही दौंड आपला गड
राखण्यात यशस्वी होतील का. तर जिरेवाडीच्या निवडणुकीत प्रहार चे मुकुंद आंधळे यांची राजकीय एन्ट्री कशी होते याविषयी जोरदार चर्चा
राजकीय वर्तुळात सुरू आहेत. सर्व प्रश्नांची उत्तरे २० तारखेला लागणाऱ्या निकालानंतरच मिळणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button