इतर

बिडी कामगारांचा पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा!

पुणे दि १८ –किमानमान वेतनच्या अंमलबजावणी करिता बिडी कामगारांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे मोर्चा काढला
राज्यात वेगवेगळ्या ब्रँड चे 17-18 बिडी कारखाने कार्यरत आहेत या मध्ये सुमारे 2.50 लाख कामगार कार्यरत आहेत. या कामगारांचे मुख्य काम म्हणजे घरखेप व कंपनीत बिडी वळण्याचे काम आहे या मध्ये बहुतांश महिला कामगार कार्यरत आहेत.

महाराष्ट्र राज्य सरकार ने 2014 साली प्रति दिन प्रति हजार बिडी स रू 332 रू घोषित केले होते परंतु कारखानदारांनी याची अंमलबजावणी केली नाही या बाबतीत संघटनेने राज्य सरकार, कामगार आयुक्त महाराष्ट्र कार्यालय, जिल्हा कार्यालयात वारंवारं पाठपुरावा, आंदोलन करूनही याची दखल घेतली नाही. यांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य बिडी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) ने घसेटी पुलं भवानी पेठ ते जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे मोर्चा व्दारे, निदर्शने केली.
या वेळी संघटनेचे सरचिटणीस ऊमेश विस्वाद संबंधीत करताना अन्न, वस्त्र, निवारा,आरोग्य ,शिक्षण, प्रवास व ईतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्याने गोरगरीब बिडी कामगारांचे जीवन जगणे अत्यंत अवघड झाले आहे. सध्या बिडी कामगारांना प्रति माहे रू 2800 ते रू 5200 येवढेच वेतन मिळते आहे या मध्ये किमान गरजाही पुर्ण करणे जिकिरीचे झाले आहे. बिडी कामगार आर्थिक व सामाजिक दृष्ट्या मागासलेला आहे, मालक समावेत सौदेबाजी, न्यायालयात जाणे, याची ताकद नाही यामुळे बिडी कामगार भारतीय मजदूर संघाच्या दि 21 डिसेंबर 2022 रोजी मुंबईत होणाऱ्या मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात सामील होण्याचे आवाहन विस्वाद यांनी कलेक्टर आॅफीस समोर झालेल्या सभेत दिले आहे.
या वेळी संघटनेने निवेदन गृह शाखा मधील वरिष्ठ अधिकारी श्री पिरजाते यांनी स्विकारले आहे या वेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हा अध्यक्ष श्री अर्जुन चव्हाण, अखिल भारतीय ठेका मजदूर महासंघाचे सरचिटणीस सचिन मेंगाळे बिडी कामगार प्रतिनिधी वासंती तुम्मा, सुवर्णा नराल, लक्ष्मी वल्लाळ, बेबी राणी डे , श्रीमती नल्ला यांनी नेतृत्व केले व शिष्टमंडळात सहभागी होते .
com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button