
अकोले प्रतिनिधी
तालुक्यातील समशेरपूर जिल्हा परिषद गटातील कोंभाळणे गावात 67 लक्ष रुपये निधीची विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले
गेली दहा वर्षांपासून जिल्हा परिषद समशेरपूर गटात नेतृत्व करण्याची संधी या भागातील नागरिकांनी दिली आहे तेव्हापासून या गटातील अनेक मूलभूत प्रश्न जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मार्गी लावले असून विकास कामांच्या माध्यमातून गटातील सर्वच गावांना आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे यांनी यावेळी सांगितले
कोंभाळणे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आज पद्मश्री सौ राहीबाई पोपेरे , शिवसेनेचे नेते डॉ विजय पिपेरे , जिल्हा परिषद सदस्य सौ सुषमाताई दराडे ,माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या वेळी ते बोलत होते .
ते पुढे म्हणाले की नगर जिल्ह्याच्या दृष्टीने अकोले हा तालुका शेवटचे टोक आहे

जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या योजना आणि जिल्हा परिषदेचा विकास निधी हा जास्तीत जास्त आपल्याच मतदार संघात कसा आणता येईल या साठी मोठी रस्सी खेच असताना देखील आम्ही त्या सभागृहात आवाज उठण्याचे काम करून जास्तीत जास्त विकास कामे गटात कसे आणता येतील जिल्हा परिषदेच्या सर्वच योजना आपल्या गटात कश्या राबवता येतील या दृष्टीने पावले टाकल्याने आज आपल्या समशेरपूर गटामध्ये विकास कामे दिसत आहे गेली दहा वर्षात या गटातील अनेक मूलभूत प्रश्न आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मार्गी लावले आहेत आज गावच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली कामे आज मार्गी लागले असून 1) केळी ते कोंभाळणे रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 30 लक्ष रुपये
2) सिद्धार्थ नगर वस्ती येथे समाज मंदिर बांधणे 7 लक्ष
3) जिल्हा परिषद दोन शाळा नवीन खोली बांधकाम करणे 20 लक्ष
4) सिद्धार्थ नगर येथे पाणी पुरवठा करणे 5 लक्ष
5) सिद्धार्थ नगर येथे समाज मंदिर दुरुस्त करणे 5 लक्ष
असे एकूण 67 लक्ष रुपये निधीच्या विकास कामांचे भूमिपूजन आज करण्यात आले
या उद्घाटन प्रसंगी पद्मश्री सौ. राहीबाई पोपेरे, जिल्हा परिषद सदस्य सौ सुषमा ताई दराडे, शिव सेनेचे ज्येष्ट नेते डॉ विजय पोपेरे , माजी उपसभापती मारुती मेंगाळ , बाळू साबळे, गोविंद सदगीर, किसन सदगीर, बांबळे गुरुजी,भरत मेंगाळ, सुदाम एखंडे, मुकेश सदगीर, विजय दराडे, शांताराम सदगीर,सौ शांताबाई पोपेरे, तुकाराम सदगीर, भागवत बेनके, आनंद सदगीर, मधुकर बिंन्नर, हिरामण पोपेरे, सखाराम पोपेरे, तुकाराम पोपेरे, भूषण सदगीर, अनिता सदगीर, या सहित आदी कार्यकर्ते उपस्थित होते
