अकोले शहरात झेब्राक्रॉसिंग व दुभाजक टाका.

अकोले /प्रतिनिधी
अकोले शहरातील शेकईवाडी रोकडोबा मंदिर ते नवलेवाडी फाटा राज्य मार्ग ५० वरील अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे निवेदन ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोले तालुक्याचे निवेदन देताना जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलीक, ज्ञानेश पूंडे सार्वजनिक बाधकाम विभागाचे उप अभियंता महेंद्र वाकचौरे यांना दिले.
अकोले शहरातील राज्य मार्ग ५० वर रोकडोबा मंदिर शेकईवाडी ते नवलेवाडी फाटा दरम्यान रस्त्यात सतत अपघात होत आहे यात अनेकांचे अपघाताने हातपाय मोडले तूसेच अनेकांना प्राणही गमवावे लागले आहे अकोले शहरातील परिसरामध्ये मॉडर्न विद्यालय, अगस्ति महाविदयालय (कॉलेज) कन्या → विद्यालय, ‘आय,टी, आय, अभिनव पब्लिक स्कूल, अगस्ति विद्यालय, एस टी बसस्थानक ग्रामिण रुग्णालय, अगस्ति … साखर कारखाना, कोर्ट, (कचेरी) तहसिल कार्यालय, पंचायत समिती, सबरजिस्टर, इतर शासकीय कार्यालय तसेच निमशासकीय कार्यालय बँका व पतसंस्था व इतर कार्यालयीन दैनंदिन कामकाजासाठी नागरिकांची कायम वर्दळ आहे
दुसरा पर्यायी मार्ग नसल्या मुळे अपघाताचे प्रमाण दिवसागणिक वाढत असून सहानुभूती पूर्वक लक्ष घालून अकोले श व्हाइट श हरातून जाणाऱ्या राज्य मार्गावर दुभाजक बसविण्यात यावे ‘दिशा’ दर्शक’ रोड साईन, झेब्राक्रॉसिंग, इ. गोष्टीचा अंतर्भाव केलेला असावा.
महाराष्ट्र शासने सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ता सुरक्षा जनजागरण अभियान सुचित केले असून त्याची अंबल बजावनी ही कादपञी होते की काय ? रस्ता वाहतुकीची चिन्हे बंधनकारक असून व रस्ता वाहतुकीच्या वेळी सावधान करणारी चिन्ह, चिन्हे, दिसत नाही. वरिल बाबिचा विच्यार व्हावा अन्यथा पूर्वसूचना न देता रस्तारोको, उपोषण व इतर मार्गाचा अवलंब करून जन आंदोलन छेडण्यात येईल यांची सर्वस्वी जबाबदारी आपल्या कार्यालयावर राहिल वरिल याचे निवेदन कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभांग संगमनेर,
साहायक अभियंता सा. बा. उपविभाग अकोले,तहसिलदार अकोले, पोलिस निरिक्षक अकोले यांना देण्यात आले
आहे. निवेदनावर ग्राहक पंचायत महाराष्ट्र जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र मंडलीक, सहसचिव रमेश राक्षे, तालुका अध्यक्ष दत्ता शेनकर, सचिव राम रुद्रे, कार्या अध्यक्ष महेश नवले, अँन्ड राम भांगरे, अँन्ड दिपक शेटे, कवी ज्ञानेश पुंडे, दत्ता ताजने, भाऊसाहेब वाकचौरे, भाऊसाहेब वाळुंज, रामहारी तिकडे भाऊसाहेब गोर्डे, माधवराव ‘टिटमे, प्रमोद मंडलीक, नरेंद्र देशमुख, कैलास तळेकर, रामदास पांडे, राजेंद्र घायवट, सुदिन माने, सुनिल देशमुख, धनंजय संत, शुभम खर्डे, सुदाम मंडलीक, मच्छिंद्र चौधरी, सखाहरी पांडे आदिच्या सह्या आहे.