इतर

माजी मंत्री पिचड यांना पुणे विद्यापीठाचा “जिवन साधना गौरव” पुरस्कार प्रदान!

अकोले- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा “जिवन साधना गौरव” पुरस्कार माजी आदिवासी विकासमंञी मधुकरराव पिचड यांना प्रदान करण्यात आला.

      सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्र सरकारच्या निती आयोगाच्या उपसमितीचे सदस्य श्री. भिकूजी (दादा) इदाते यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू डाॅ.कारभारी काळे हे होते. प्र.कुलगुरू डाॅ.संजीव सोनवणे आणि कुसचिव डाॅ.प्रुफुल्ल पवार, सुनेत्राताई पवार, माजी आमदार नंदकुमार झावरे, सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी, नृत्य दिग्दर्शिका मनीषा साठे, माजी आमदार वैभवराव पिचड हे उपस्थित होते.

  माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना दिलेल्या गौरव पत्रात म्हटले आहे कि, कळसूबाईचे  शिखरयात्री, अहमदनगर जिल्ह्यातील जलक्रांतीचे आधुनिक भगीरथ, अकोले तालुक्याचे पितामह भाग्यविधाते, माळरानावर हिरवाई फुलविणारे जलक्रांतीचे द्रष्टा नेते, तरुणांचे आधारस्तंभ, आदिवासी विकासाचे शिल्पकार, निर्मोही व्यक्तिमत्त्वाचे कर्मयोगी, पाणी, वीज, शेती, सहकार, शिक्षण या क्षेत्राला आपल्या विधायक हस्तक्षेपाने विकाससन्मुख झळाळी देणारे सामाजिक व राजकीय कर्तृत्व ही आपल्या व्यक्तित्वाची सार्थ ओळख आहे.

पंचायत समितीचे सभापती, राज्याचे मंत्री ते विरोधीपक्ष नेता म्हणून कधी संघर्षरत तर कधी समन्वयवादी भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय संरचनेचे उभे केलेले प्रारूप कळसूबाई शिखरासारखे उत्तुंग आहे. आदिवासी विकासाची प्रामाणिक आस्था असणारे आमदार या नात्याने आपण केलेले कार्य स्पृहणीय आहे. गेली चार दशके आपण सामाजिक व राजकीय क्षेत्राला दिलेल्या योगदानाची साक्ष महाराष्ट्रातील जनता ध्यानी-मनी बागवत आहे. वडील काशिनाथ पिचड गुरुजी यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्या कर्तृत्वावर प्रगाढ ठसा उमटला. आपली कुटुंबवत्सलता त्याचेच प्रतिबिंब होय. निळवंडे, बलठण, कोथळे, अंबीत, शिरपुंजे, घोटी, शिळवंडी, सांगवी, पाडोशी इत्यादी धरणांची मालिका आपल्या पाणीदार व्यक्तिमत्त्वाची साक्ष देते. मुळा, म्हाळुंगी, घोडसरवाडी, मुथाळणे इत्यादी वनबंधारे आपल्या पर्यावरणपूरक विकसनशिलतेचा आदर्श म्हणून उभी आहेत. अकोल्याच्या पर्यटन विकासातील इको फ्रेण्डली स्वच्छतागृहे, सौरऊर्जा दिवे, रतनगडावरील स्वच्छता, निसर्ग निरीक्षणासाठीची उच्च मनोरे अशा नावीन्यपूर्ण उपक्रमांद्वारे महाराष्ट्राच्या उज्वल भौगोलिक नकाशावर उमटलेली आपली बांधिलकी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पट्टा किल्ल्यावरील शिवसृष्टी, कळसूबाई शिखराचे विद्युतीकरण, रंधा फॉल परिसर विकास, अगस्ती, अमृतेश्वर, खंडेश्वर, केळेश्वर, बाळेश्वर, कोतुळेश्वर या तीर्थक्षेत्रांचा विकास, प्रशासकीय इमारती, रस्ते, वैद्यकीय चिकित्सालये, आदिवासी उन्नती सेवा मंडळाचे उच्च व तंत्रशिक्षण महाविद्यालय, आश्रम शाळा, घाटघर उदनचंद जलविद्युत प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प, अमृतसागर दूध संघातून केलेली धवलक्रांती, दारूबंदी, आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरेंचा आदर्श समाजासमोर ठेवण्यासाठी उभारलेले स्मारक अशी समाजाच्या सर्व घटकांचे सर्वस्पर्शीत्व दर्शवणारी कामे आपल्या बहुआयामी सामाजिक व राजकीय समर्पणाचा विस्तीर्ण आलेख रेखाटतात.

आपल्यासारख्या सामाजिक व राजकीय लोकाभिमुखतेचा गौरव करण्यासाठी आणि आपल्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आपणास जीवनसाधना गौरव पुरस्कार सानंद प्रदान करीत आहे. “

       माझ्या जीवनातील सर्वोच्च पुरस्कार असून जीवनात केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव आहे. आदिवासी समाजाचे शिक्षणासाठी आश्रमशाळा निर्माण केले असून आदिवासी साठी स्वतंत्र बजेट, पेसा कायदा केला. हा पुरस्कार माझा नसून अकोले तालुक्याचे जनतेचा व अकोले तालुका एजुकेशन संस्थेचे संस्थापक दादासाहेब रुपवते, यशवंतराव भांगरे, भाऊसाहेब हांडे, लालचंद शाह यांना समर्पित

मधुकरराव पिचड,

माजी आदिवासी विकास मंत्री

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button