तरुणांनी सदगुणांची आणि उपासनेची व्यसने करावी पोलीस निरीक्षक गणेश इंगळे

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
तरुणांनी व्यसने करायची असतील तर सद गुणांची , ज्ञान उपासनेची व्यसने करावीत, असे प्रतिपादन राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे यांनी केले.
अकोले तालुक्यातील राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मशाल प्रज्वलन करून व क्रीडांगणामध्ये श्रीफळ वाढवून क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षस्थानी राजुरचे उपसरपंच संतोष बनसोडे होते. तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव बापू काळे, ग्रामपंचायत माजी उपसरपंच गोकुळ शेठ कानकाटे ,सदस्य सारिका वालझाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल फटांगरे उपस्थित होते.
प्रत्येक व्यक्तीमध्ये देवाने कला दिलेली आहे. तिचे संवर्धन करा व मोठे व्हा आणि त्याचा देशासाठी उपयोग करा मोबाईल हे व्यसन जोडले जात आहे .त्यापासून दूर राहा पुस्तके वाचून देशाचे आदर्श नागरिक बना.त्यासाठी जिद्द मेहनत व चिकाटी ठेवून अभ्यास करा . क्रिडागणावर किमान एक तास घालवा त्यातून तुमच्यातील खेळाडू निर्माण होईल ,देशासाठी खेळा व देशाचे ,कुटुंबाचे आपल्या गुरुजनांचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर न्या .असेही सहायक पोलीस निरीक्षक गणेश इंगळे म्हणाले.
उपसरपंच संतोष बनसोडे यांनी शाळेतील ग्राउंड नष्ट होत आहे.खेळ हरवला आहे.श्री स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी खेळ व गुणवत्ता यात अव्वल आहेत .याचे कौतुक आहे . विद्यार्थ्यांनी अतिशय जोशपूर्ण वातावरणामध्ये उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य मंजुषा काळे यांनी केले. सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी केले तर आभार साहेबराव कानवडे यांनी मानले.