संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींची आज मतमोजणी

संजय साबळे
संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींचे मतदान रविवारी पार पडल्यानंतर आज मंगळवारी या ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये प्रत्यक्ष सुरुवात होणार असून दुपारी दोन वाजेपर्यंत सर्व निकाल हाती येणार आहेत. नऊ फेऱ्यांमध्ये ही मतमोजणी होणार आहे
तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी रविवार (दि.१८) डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानात सुमारे ३७ हजार १५३ महिला मतदारांनी तर ४१ हजार ७६५ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. साकुर येथे एका महिला उमेदवाराच्या पतीकडून आलिशान गाडीतून वाटली जात असणारी दारू घारगाव पोलिसांनी पकडल्याचा प्रकार व किरकोळ बाचाबाचीचे प्रकार वगळता सर्वत्र निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडल्याची माहिती समजली आहे. या ३७ गावात सरासरी ८० टक्के मतदान झाले आहे.
आज मंगळवारी सकाळी दहा वाजता शहरातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे १५० कर्मचारी कार्यरत असणार आहेत.
सकाळी १० वाजता पहिल्या फेरीत –
वाघापूर (टेबल क्रमांक १ ते ३), खराडी (टेबल क्रमांक ४ ते ६), चिंचोली गुरव (टेबल क्रमांक ७ ते १०), जांभूळवाडी (टेबल क्रमांक ११ ते १३), रणखाबंवाडी (टेबल क्रमांक १४ ते १६), दरेवाडी (टेबल क्रमांक १७ ते १९), सायखिंडी (टेबल क्रमांक २०),
साडेदहा वाजता दुसऱ्या फेरीत – जांबुत बुद्रुक (टेबल क्रमांक १ ते ३), कर्जुले पठार (टेबल क्रमांक ४ ते ६), डोळासने (टेबल क्रमांक ७ ते ९), पिंपरणे (टेबल क्रमांक १० ते १३), कोल्हेवाडी (टेबल क्रमांक १४ ते १९), सकाळी
११ वाजता तिसऱ्या फेरीत– अंभोरे (टेबल क्रमांक १ ते ४), कोळवाडे (टेबल क्रमांक ५ ते ७), निंबाळे (टेबल क्रमांक ८ ते १०), जोवेॅ (टेबल क्रमांक ११ ते १७), मालुंजे (टेबल क्रमांक १८ ते २०).
११.३० वाजता चौथ्या फेरीत — वडझरी बुद्रुक (टेबल क्रमांक १ ते ३), निमोण (टेबल क्रमांक ४ ते १०), वडझरी खुर्द (टेबल क्रमांक ११ ते १३), करूले (टेबल क्रमांक १४ ते १६), निळवंडे (टेबल क्रमांक १८ ते १९),
दुपारी १२ वाजता पाचव्या फेरीत — हंगेवाडी (टेबल क्रमांक १ ते ३), कनकापूर (टेबल क्रमांक ४ ते ६), ओझर खुर्द (टेबल क्रमांक ७ ते ९), सादतपूर (टेबल क्रमांक १० ते १२), रहिमपूर (टेबल क्रमांक १३ ते १५), उबंरी बाळापुर (टेबल क्रमांक १६ ते १९),
१२.३० वाजता सहाव्या फेरीत— निमगाव जाळी (टेबल क्रमांक १ ते ७), चिकणी (टेबल क्रमांक ८ ते १०), धांदरफळ खुर्द (टेबल क्रमांक ११ ते १४), धांदरफळ बुद्रुक (टेबल क्रमांक १५ ते १९),
१.०० वाजता सातव्या फेरीत—
तळेगाव दिघे (टेबल क्रमांक १ ते १०), साकुर (टेबल क्रमांक ११ ते १९), दुपारी १.३० वाजता आठव्या फेरीत निमगाव भोजापूर (टेबल क्रमांक १ ते ३), घुलेवाडी (टेबल क्रमांक ४ ते २०)
२ वाजता नवव्या फेरीत — पोखरी हवेली (टेबल क्रमांक १ ते ३) अशी मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. दरम्यान या संपूर्ण मतदान प्रक्रियेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांचे बारीक लक्ष होते. कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेण्यात आली होती. आजही त्यांच्या नेतृत्वात मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडणार आहे. तसेच मतदान झालेल्या गावांमध्ये संगमनेर शहर पोलिसांच्या हद्दीत ४ तालुका पोलिसांच्या हद्दीत २३ घारगाव पोलिसांच्या हद्दीत ७ तर आश्वी पोलिसांच्या हद्दीतील ३ गावात मतदान प्रक्रिया पार पडली. या सर्व ठिकाणी अनुक्रमे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले, अरुण आव्हाड, सुनील पाटील, सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आजच्या मतमोजणीलाही पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे.