नेप्तीत जय बिरोबा ग्राम विकासाचे जपकर सरपंचपदी

अहमदनगर /प्रतिनिधी
नेप्ती (ता. नगर) येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जय बिरोबा ग्राम विकास पॅनलचे उमेदवार बहुमताने निवडून आले. विजयी उमेदवारांनी गावात गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
जय बिरोबा ग्राम विकास पॅनल विरुध्द श्री अनुलेश्वर वैष्णोमाता ग्रामविकास पॅनल यांच्यात अत्यंत चुरशीची निवडणुक झाली. यामध्ये जय बिरोबा ग्राम विकास पॅनलचे 13 जागापैकी 7 जागांवर दणदणीत विजय संपादन केला. तर सरपंच पदासाठी सविता संजय जपकर यांनी जनतेतून मताधिक्याने विजय मिळवला.
जय बिरोबा ग्राम विकास पॅनलचे सरपंचपदासह ग्रामपंचायत सदस्य निवडून आल्याबद्दल गावात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाच्या उधळणसह एकच जल्लोष सुरु होता. यावेळी नवनिर्वाचित सरपंच सविता जपकर यांचा ग्रामस्थांच्या वतीने रामदास फुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यासाठी संजय आसाराम जपकर, सोनाली बंडू जपकर, फारुक चांद सय्यद, अनिता दादू चौगुले, संभाजी बाळू गडाख, एकनाथ आसाराम जपकर, विमल बाबासाहेब होळकर निवडून आले आहेत.निवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा ठिकठिकाणी सत्कार सुरु होता.
विजयी जल्लोष सुरू होता यावेळी माजी सरपंच विठ्ठल जपकर , संजय जपकर ,श्रीपती जपकर, सुधाकर कदम, माजी पं. स .सदस्य किसन होले , साई संजीवनी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रघुनाथ होळकर माजी चेअरमन पांडुरंग जपकर, मच्छिंद्र होळकर, मार्केट कमिटी माजी संचालक वसंतराव पवार, रामदास फुले, प्रा.एकनाथ होले, शिवाजी होळकर, जालिंदर शिंदे, भानुदास फुले ,नितीन कदम, नाना बेल्हेकर, विलास जपकर, दशरथ जपकर, राजाराम जपकर, भास्कर जपकर, बंडोपंत कांडेकर, मुरलीधर जपकर, गजानन होळकर ,सयाजी ज्ञानेश्वर जपकर ,अतुल गवारे ,अतुल जपकर ,जमीर सय्यद ,सत्तार सय्यद, बाबुलाल सय्यद, जपकर, रावसाहेब होळकर, अन्सार सय्यद, एकनाथ होळकर, नाथा जपकर, शरदराव पवार, बबन सय्यद, रंगनाथ जपकर, राजेंद्र जपकर, कैलास पवार, राजू गाडेकर,गोरख जपकर, मधुकर कदम, गणेश कदम, बबनराव फुले, नाना कदम, शिवाजीराव गाडेकर, बाळासाहेब बेल्हेकर, सचिन कदम, गुलाब स बाळासाहेब गाडेकर, आकाश गाडेकर, विकास मोरे, दादा जपकर, यादव बेल्हेकर, रोहिदास जपकर, पै.योगेश पवार, गोरख जपकर, मुनिसभाई सय्यद, बाबू होळकर, बाळू कर्डिले, विकास मोरे, भरत कांडेकर, आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
